Sanjay Raut: मुंबईच्या गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) अटक केली. 30 जुलै रोजी राऊतांना ईडीने अटक केली होती.
संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपली. शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा ED च्या विशेष PMLA न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. 22 दिवसांपासून तुरूंगात असलेल्या राऊतांना बेल मिळणार की जेल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले असताना राऊतांना आजही दिलासा मिळाला नाही.
शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या जिल्हा बँका राज्य बँकेत विलीन होणार? मोदी सरकारचा निर्णय
संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा यंदाचा गणेशोत्सव तुरूंगातच जाणार असल्याची चिन्हे आहेत. पत्राचाळ प्रकरणी राऊतांची चौकशी सुरू असून त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी ईडीकडून करण्यात आली होती.
Share your comments