द्राक्ष पंढरी म्हणून जगात विख्यात असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातुन एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात द्राक्षाची लागवड केली गेली आहे. द्राक्ष बागायतदार (Grape growers) द्राक्षाच्या शेतीतून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त करतात. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी द्राक्ष पिकावर अवलंबून आहेत. द्राक्ष बागायतदार लाखो रुपयांचा खर्च करून, अहोरात्र कष्ट घेऊन द्राक्षाची बाग (The vineyard) उत्पादनासाठी सज्ज करतो व चांगले विक्रमी उत्पादन प्राप्त करतो. मात्र वर्षानुवर्षे द्राक्ष बागायतदारांची द्राक्षाच्या तोंडी सौदे आणि खरेदीतून द्राक्ष खरेदी करणारे व्यापारी लूट करत आले आहेत.
द्राक्षे खरेदी करणारे व्यापाऱ्यांकडून होणारी ही आर्थिक कोंडी थांबविण्यासाठी व व्यापाऱ्यांच्या या अनैतिक कारभाराला आळा घालण्यासाठी द्राक्ष उत्पादक संघाने एक रामबाण तोडगा शोधून काढला असल्याचे समोर आले आहे. द्राक्ष उत्पादक संघ, व्यापाऱ्यांच्या या अनियंत्रित कारभाराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील तमाम लोकप्रतिनिधी (People's representative), ज्येष्ठ वकील यांचे सहकार्य घेत आहेत. यानुसार आता, द्राक्षाचे सौदे (Grape deals) फक्त मौखिक स्वरूपाचे राहणार नसून आता द्राक्षाचे सौदे वा व्यवहार लेखी स्वरूपाचे होणार असल्याचे समजत आहे. द्राक्षे खरेदी करताना आता व्यापाऱ्यांना सौद्याची पावती बागायतदारांना सुपूर्द करणे अपरिहार्य राहणार असल्याचे समजत आहे. या लेखी पद्धतीने द्राक्षाचे व्यवहार झाल्यास द्राक्ष खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या अनियंत्रित कारभाराला आळा बसणार असून द्राक्ष बागायतदार यांची होणारी आर्थिक कोंडी देखील कमी होईल असा उत्पादक संघाचा अंदाज आहे. वर्षानुवर्ष द्राक्षाच्या खरेदीत द्राक्ष बागायतदारांची फसवणूक होत आली आहे मात्र उत्पादक संघाच्या या तोडग्यामुळे यावर आळा बसू शकतो. आतापर्यंत द्राक्ष ऊस तोडणीच्या अगोदर व्यापारी फक्त मौखिक सौदे अर्थात तोंडी सौदे बागायतदारांसमवेत करत असत, मात्र सौदे झाले आहेत म्हणून त्या द्राक्ष बागाची तोडणी होईलच हे निश्चित नव्हते. द्राक्षे खरेदी करणारे व्यापारी आपल्या सोयीने व बाजारपेठेतील सकारात्मक परिस्थिती बघताच द्राक्ष बागांची तोडणी करत असत. द्राक्षाचे बाजार भाव कमी झाले की व्यापारी वर्ग सौदा होऊन देखील त्या बागांची तोडणी करण्यास येत नसत. म्हणजे बाजारपेठेतील चित्र जर व्यापाऱ्यांच्या अनुकूल असले तर तोडणी होत असे आणि जर बाजारपेठेतील चित्र व्यापाऱ्यांच्या प्रतिकूल असले तर केलेला सौदा हवेत विरत असे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांची विक्रमी उत्पादन घेऊन देखील आर्थिक कोंडी होत असे. मात्र आता उत्पादक संघाच्या या निर्णयामुळे किंवा उपायामुळे द्राक्षाचे सौदे मौखिक राहणार नसून लेखी स्वरूपाचे बनणार आहेत त्यामुळे द्राक्षाचा सौदा झाला म्हणजे व्यापारीला त्या द्राक्षांची तोडणी करणे अपरिहार्य होऊन जाणार आहे. याआधी असा गैरव्यवहार अनेकदा नजरेसमोर आला आहे, त्याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी तक्रार देखील दाखल केली आहे. मात्र गुन्हे दाखल करूनही व्यापारीवर्ग त्यामधून आरामात सुटतो आणि द्राक्ष बागायतदारांची नाहक फेरफट होते. त्यामुळे द्राक्ष उत्पादक संघाने हा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे.
राज्यात आतापर्यंत मौखिक सौदे द्राक्षांचे होत आले आहेत. या मौखिक अर्थात तोंडी सौद्यात व्यापारीवर्ग द्राक्ष बागायतदारांना सौदा झाला म्हणून इसार स्वरूपात तुटपुंजी रक्कम देत असतो. मात्र त्यानंतर बाजारपेठेत जर अनुकूल चित्र नसेल तर व्यापारी वर्ग अशा सौंद्याकडे पाठ फिरवीत असतो. या मौखिक स्वरूपात बागायतदाराकडे कुठलाच पुरावा नसल्याने व्यापारी वर कायदेशीर कार्यवाही देखील केली जाऊ शकत नाही. म्हणजे बागायतदारांची सर्रासपणे फसवणूक करूनही या व्यापाऱ्यांवर कारवाई होत नाही. त्या अनुषंगाने द्राक्ष उत्पादक संघाने हा तोडगा काढला आहे. द्राक्ष बागायतदार संघाने, हा तोडगा काढण्यासाठी सुमारे दोन महिने प्रयत्न केले आहेत. द्राक्ष बागायतदार संघाने या कामासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा, पोलीस प्रशासनाचा, जिल्ह्यातील कायदेविषयक तज्ञांचा सल्ला घेतला आहे.
मौखिक सौद्यात सौंद्यामध्ये ठरवण्यात आलेला दर व्यापाऱ्यांकडून बागायतदारांना देण्यात येत नव्हता, बाजार भाव पडले असा युक्तिवाद करत बागायतदारांकडून कमी दरात द्राक्ष खरेदी केले जात होते. त्यामुळे या लेखी स्वरूपाच्या सौंद्याने या तमाम गैरव्यवहाराला आळा घातला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. नाशिकचा हा द्राक्ष खरेदीसाठीचा पॅटर्न भविष्यात द्राक्षबागायतदार साठी फायदेशीर सिद्ध होऊ शकतो तसेच नाशिकचा हा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवण्याची देखील आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांद्वारे यावेळी सांगितले गेले.
Share your comments