मुंबईः खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या नावे पुन्हा नव्यानं वॉरंट जारी करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'मातोश्री' या खासगी निवासस्थाना बाहेरील हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातून राणांविरोधात हा वॉरंट जारी झाला आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राणा दाम्पत्य हजर राहात नसल्याचं दिसून येतंय. येत्या ११ नोव्हेंबर रोजी ठरलेल्या सुनावणीसाठी राणा हजर राहिले नव्हते. त्यामुळे कोर्टाने त्यांना वॉरंट जारी केलं आहे.
हे वॉरंट जामीनपात्र आहे. ५ हजारांच्या जामिनावर त्यांची सुटका होईल. मात्र इथून पुढच्या सुनावणींसाठी राणा दाम्पत्याला हजर राहावं लागणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हे वॉरंट जारी केलं.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषीमंत्र्यांनी केली नवी घोषणा; आता...
मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुरू असलेल्या या खटल्यास आरोपी सतत तीन सुनावणीत गैरहजर राहिल्यानं अखेर कोर्टानं ही दंडात्मक कारवाई केली आहे.
हा जामीनपात्र वॉरंट असल्यानं पुढील सुनावणीस हजर होत पाच हजार रूपयांचा जामीन दोघांनाही मिळवता येईल. मात्र त्यावेळीही राणा दांपत्य गैरहजर राहिल्यास त्यांच्याविरोधात कोर्ट अजामीनपात्र वॉरंट जारी करत अटकेच्या कारवाईचे आदेश देऊ शकतं.
सर्वसामान्यांना दिलासा! एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त; जाणून घ्या किंमत
Share your comments