Cabinet expansion: राज्यात अनेक घडामोडीनंतर शिंदे-फडवणीस सरकार आले. या सरकारचा अडीच महिन्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. शिंदे आणि फडणवीस गटाकडून १८ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी देण्यात आली होती.
आता दुसऱ्या टप्प्यांतील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लवकरच शिंदे-भाजप (Shinde-BJP) सरकारचा दुसऱ्या टप्प्यांतील मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नाराज आमदारांना मंत्री होण्याची संधी मिळणार का? या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मोठी बातमी! या जिल्ह्यातील साखर कारखाने लवकरच सुरू होणार!
नव्या मंत्र्यांच्या नावांवर चर्चा होऊन ती अंतिम करण्यात येत असल्याचेही सांगितले. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची नाराजी दूर होण्याची शक्यता आहे.
7th Pay Commission: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना या दिवशी मिळणार मोठी भेट!
पितृपंधरा संपल्यानंतर लगेचच मंत्रीमंडळ विस्तार करण्याच्या हालचाली सुरू आहे. याआधी विस्तार रखडल्याने भाजपमुळेच नव्याने विस्तार होण्यात अडचणी असल्याचे शिंदे गटातील आमदारांनी मत व्यक्त केलं आहे.
धानुका अँग्रीटेक कडून नाशिकमध्ये द्राक्ष तज्ञांचा मेळावा आयोजित
Share your comments