महाराष्ट्राच्या राजकारणातून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाने धक्का दिला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार बच्चू कडू यांना गिरगांव कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी मोठी गर्दी झाली होती.
बच्चू कडू यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. ते स्वत: आज गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले होते. यावेळी हा निर्णय देण्यात आला आहे.
'काटामारीतून कारखानदार टाकतात ४५८१ कोटींचा दरोडा'
बच्चू कडू यांच्याविरुद्ध राजकीय आंदोलन केल्या प्रकरणी निषेधाचा गुन्हा दाखल झाला होता. याबाबत त्यांचा जामीन फेटाळण्यात आला असून न्यायालयाने त्यांना ताब्यात घेण्यात आदेश देत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो अधिक दुग्धोत्पादनासाठी असा करा मुरघास तयार, जाणून घ्या...
मुख्यमंत्री साहेब, आम्ही बिहारमध्ये राहतो का? शेतकऱ्याचे रक्ताने लिहिलेले पत्र व्हायरल..
कांद्याच्या दरात घसरण, तरीही राज्यात मोठ्या प्रमाणावर लागवड
Share your comments