काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. यामुळे राजकारण खळबळ उडाली. त्यांनी राजीनामा का दिला? याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर आता अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
अजित पवारांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा ३२ वर्षांनी राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचं पालकमंत्री पद त्यांच्याकडे आहे. या कामाचा व्याप वाढला आहे.
त्यामुळे अजित पवारांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. अजित पवार हे गेल्या ३२ वर्षांपासून पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळत होते. पण त्यांनी आता संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.
अजित पवारांची दोन्ही मुले राजकारणात फार सक्रिय नव्हते. परंतु मागील काही दिवसांपासून ते सक्रिय झाल्याचे दिसत आहे. पार्थ पवार यांना पुणे जिल्हा बँकेचे संचालक पद मिळण्याची शक्यता आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील देशातील पहिल्या क्रमांकाची बँक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे. त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.
मागील ३२ वर्षांपासून अजित पवार जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी कार्यरत होते. १९९१ पासून त्यांनी या बॅंकेच्या संचालकपदाची धुरा हाती घेतली होती. त्यांनी या बॅंकेची मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती केली. बँकेचा मोठा नावलौकिक आहे.
अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील देशातील नंबर १ ची बँक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नावलौकिक मिळवलेला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात आणि पुण्यातील बँकेच्या क्षेत्रात मोठी चर्चा सुरु झाली.
Share your comments