महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी (MSC bank scam case) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले आहे. यामुळे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आले होते. या घोटाळ्याप्रकरणी ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्याची जमीन इमारत, मशिनरी मिळून ६५ कोटी रुपयांची मालमत्ता जुलै २०२१ मध्ये जप्त केली होती.
असे असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित ही कंपनी आहे. ईडीने आता अजित पवारांशी संबंधित या कंपनीला आरोपी बनवलं आहे.
तसेच कंपनीच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केलं आहे. हे पुरवणी आरोपपत्र आहे. मात्र, त्यात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा उल्लेखही नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार यांना ईडीने क्लीनचिट दिली की काय? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
Tractor News: हे दोन ट्रॅक्टर ठरतील शेती आणि शेतकऱ्यांसाठी वरदान, वाचा किंमत आणि खासियत..
या प्रकरणाची सुनावणी १९ एप्रिल रोजी होणार आहे. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नावे ईडीच्या आरोपपत्रातून वगळण्यात आली आहेत. असे असले तरी एमएससी बँक घोटाळ्याची चौकशी करताना समोर आलेल्या काही कंपन्यांची नावे कायम ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने पुरवणी आरोपपत्रं दाखल केलं आहे.
Drone: ड्रोन 1 दिवसांत 30 एकर शेतीवर फवारणार औषध, सरकारकडून अनुदान
या घोटाळ्याप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखान्याची 65.75 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. 2021मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. या घोटाळ्यात स्पार्कलिंग सॉइल लिमिटेड या कंपनीचं नाव आलं होतं.
एका तासात झालं होत्याच नव्हतं! एका तासात 25 लाखांचं नुकसान, शेतकऱ्यानं सांगितला थरार
शेतकऱ्यांनो माती परीक्षण प्रयोगशाळा व्यवसाय सुरू करा; कमवाल लाखों रुपये
कोल्ड स्टोरेज व्यवसायाच्या माध्यमातून साधा आर्थिक प्रगती, जाणून घ्या संपूर्ण माहिती..
Share your comments