सध्या देशातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. साखरेचा हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. ३० नोव्हेंबरअखेर देशातील ४१७ कारखान्यांनी ४७ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. यावर्षी देखील रेकॉर्डब्रेक उत्पादन होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक २० लाख टन साखर उत्पादन नोव्हेंबर अखेरपर्यंत झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून साखर उत्पादन होण्याचा वेग वाढला आहे. अजून काही महिने हा वेग असाच राहणार आहे. यामध्ये उसाची पळवापळवी होत आहे.
असे असताना जागतिक बाजारात साखरेचे वाढलेले दर (Sugar Rate) तर स्थानिक बाजारात कमी असलेला उठाव यामुळे काही साखर कारखानदारांनी अगोदर केलेल्या साखर करारात (Sugar Export Agreement) मोडतोड केली. यामुळे कारखान्यांना तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
Sugarcane FRP: ‘किसन वीर’ कारखान्याची २५०० पहिली उचल
मुळे निर्यातदारांनी (Sugar Exporter) नव्या कोट्याचे करार करताना आता या कारखान्यांकडे लक्ष देणेच बंद केले आहे. साखर निर्यातदारांनी करार मोडलेल्या कारखान्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे अशा कारखान्यांच्या प्रतिनिधींना निर्यातदारांचे उंबरे झिजवावे लागत आहेत.
देशात यंदा गेल्या वर्षीपेक्षा या वेळेपर्यंत १५ कारखाने जास्त सुरू झाले आहेत. यामुळे साखर उत्पादनाचा वेग कायम आहे. सध्या तयार होणारी साखर तातडीने विक्री करणे गरजेचे बनले आहे. यामुळे यासाठी कारखाने प्रयत्नशील आहेत.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी अर्ज करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर चांगले असल्याने जास्त साखर निर्यात करण्यासाठी विशेष करून महाराष्ट्रातील कारखाने प्रयत्न करत आहेत. सध्या कारखान्यांनी काही रुपयांकरिता करार मोडल्याने अनेक निर्यातदारांना पुढे साखर विक्री तोट्यात करावी लागत आहे.
यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात दर असतानाही निर्यातदार मिळत नसल्याने संबंधित कारखान्यांची धावपळ होत आहे. सध्या नवीन साखर बाजारात येत आहे. यामुळे जुनी साखर खपवण्याची पळापळ सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या;
राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळेंना सेबीचा दणका, सभासदांना 41 कोटी परत देण्याचे आदेश
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा जिल्हा प्रशिक्षण अभ्यास वर्ग संपन्न
बारामतीकरांनो आता वेगावर ठेवा मर्यादा! स्पीडगन ठेवणार तुमच्यावर लक्ष, दोन हजारांपर्यंत दंड
Share your comments