Shivsena: शिवसेना फुटून शिंदे आणि ठाकरे असे दोन गट तयार झाले आहेत. यात आता धनुष्यबाण चिन्ह नेमके कोणाचे यावरून आता वाद सुरु आहे. शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याची सुनावणी निवडणूक आयोगासमोर (Election Commission) होणार आहे. तर निवडणूक आयोगानं त्वरीत सुनावणी घेण्यास उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विरोध दर्शवलाय.
एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) त्वरीत सुनावणी घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं शिंदेंच्या पत्राची दखल घेऊन ठाकरेंना पत्र पाठवलं. पण, ठाकरे त्वरीत सुनावणी घेण्यास तयार नाहीत.
जोपर्यंत सर्व कागदपत्रे सादर होत नाही तो पर्यंत सुनावणी घेऊ नये, कागदपत्रांसाठी अजून 4 आठवडे लागणार असल्याची विनंती उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाला करणार आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटानं निवडणूक आयोगापुढं सादर केलेली प्रतिज्ञापत्र बनावट असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटानं केलाय.
EPFO: दिवाळीपूर्वी खात्यात येणार पीएफचे व्याज, जाणून घ्या बॅलन्स कसा तपासायचा..
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने पूर्वतयारी सुरु केली आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास दुसऱ्या चिन्हाची मागणी करणार आहे. निवडणुक आयोगाकडे चिन्ह म्हणून हती, सिहं ही चिन्ह आहेत, वाघाचा चेहरा किंवा पूर्ण वाघ अशी चिन्ह उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आता सेना काय करणार हा मोठा प्रश्न आहे.
आनंदाची बातमी! या दिवाळीत अर्ध्या किंमतीत मिळणार ट्रॅक्टर; असा घ्या लाभ
शिवसेनेकडून निवडणूक आयोगांकडे वाघच्या चेहरा म्हणुन निशाणी मिळू शकते का अशी मागणी कारण्यात आलीय. जर धनुष्यबाणं हे चिन्ह गोठवलं तर तोंडावर आलेल्या पोटनिवडणीकीसाठी कोणते चिन्ह वापरायचे हा मोठा प्रश्न शिवसेने समोर आहे.
Share your comments