आपण बघतो की अनेकदा अनेकांना फसवल्याची घटना घडत असते. आता पंजाबमधून अशीच एक बातमी समोर आली आहे. आता पंजाबमध्ये घोडा (Horse) खरेदीत एका व्यक्तीची फसवणूक झाली आहे. ही एक लाख किंवा दोन लाखांची फसवणूक नसून २३ लाखांची फसवणूक आहे. यामुळे फसवणूक झालेल्या व्यक्तीला धक्काच बसला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे.
ही फसवणूक घोडे-व्यापाराशी संबंधित आहेत. याबात रमेश कुमार हा पोलीस स्टेशन (Police station) शहर सुनम येथील वॉर्ड क्रमांक-१४ मोहल्ला हरचरण नगर लेहरागागा येथील रहिवासी आहे. सुंदर सिटी सुनम येथील रहिवासी जतिंदरपाल सिंग सेखोन, सिंगपुरा सुनम येथील रहिवासी लखविंदर सिंग आणि लेहल कलान येथील लचरा खाना उर्फ गोगा खान यांनी रमेश कुमार यांची फसवणूक केली.
आरोपींनी मिळून २३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तिघांनीही घोडा काळ्या रंगाचा रमेशला विकला होता, मात्र घरी जाऊन घोड्याला अंघोळ घातली तेव्हा तो लाल निघाला. यामुळे त्यांना हा फसवणुकीचा प्रकार समजला. काळ्या घोड्यासाठी २२ लाख ६५ हजार रुपये आरोपींना दिल्याचे पीडित रमेशचे म्हणणे आहे. यामुळे सध्या पोलीस चौकशी सुरु आहे.
या घोड्याचा सौदा लचरा खानने केला होता. त्यांनी ७ लाख रुपये चेकद्वारे दिले होते. आरोपींनी जे घोडे दाखवले होते ते दिलेले नाहीत. या दोघांनी मिळून निकृष्ट दर्जाचे घोडे विकून वासूची लाखो रुपयांची फसवणूक केली. याची सध्या चर्चा सुरु आहे. अनेकदा जनावरे खरेदी करताना देखील मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते.
महत्वाच्या बातम्या;
आता शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये अल्पदरात भोजन; अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन
आता तरी सरकारला जाग येणार का? वीज भारनियमनाने घेतला शेतकऱ्याचा बळी
सोनं लवकरच दराचा रेकॉर्ड गाठण्याची भीती? शुक्रवारी सोनं महागले
Share your comments