1. बातम्या

आपल्या ग्राहकांसाठी एचपीची नवी ऑफर; व्हाट्स एप्प वर देणार सिलिंडर बुकिंगची सुविधा

एचपी हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारकडून नागरिकांसाठी अनेक योजना आणल्या जात आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी आणि आपल्या ग्राहकांना व्यवस्थित सेवा देण्यासाठी कंपनीने व्हाट्स एप्प द्वारे सिलिंडर बुकिंगची सुविधा दिली आहे.

KJ Staff
KJ Staff


एचपी (हिंदुस्तान पेट्रोलियम) कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी  आनंदाची बातमी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारकडून नागरिकांसाठी अनेक योजना आणल्या जात आहेत.  नागरिकांच्या सोयीसाठी आणि आपल्या ग्राहकांना व्यवस्थित सेवा देण्यासाठी कंपन्यांही नव नवीन उपक्रम  करत आहेत. आता एचपी कंपनीने  व्हाट्स एप्पद्वारे सिलिंडर बुकिंगची सुविधा दिली आहे.

याशिवाय आपण आयव्हीआरएसच्या Inter Active Voice Response System ) माध्यमातूनही आपण सिलिंडरची बुकिंग करणार शकणार आहात. पण लॉकडाऊनच्या काळात सिलिंडरचा सप्लाय आणि बुकिंग वेळेवर व्हावी यासाठी हे सुविधा कंपनीने सुरु केली आहे.  याविषयी बोलताना एचपीसीएलचे प्रादेशिक प्रमुख राजेंद्र पाटीदार म्हणाले की, कधी कधी ग्राहकांना IVRS आयव्हीआरएस द्वारे सिलिंडर बुकिंग करताना अडचणी येत होत्या. याची दखल घेत कंपनीने ही सुविधा पुरवली आहे. विशेष म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी लिमिटेड (एचपीसीएल) कडे सध्या जवळजवळ घरगुती सिलिंडरचा वापर करणारे ३३ दक्षलक्ष ग्राहक आहेत, तर २ हजार ६३० वितरक आहेत.

How to Book HP Gas Cylinder by Whatsapp? गॅस सिलिंडर व्हाट्स एप्पवर कसे कराल बुकिंग

बुकिंग करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. सगळ्या सोपी पद्धत आहे, व्हाट्स एप्पद्वारे गॅस सिलिंडर बुक करणं. आपल्या नोंदणी झालेल्या मोबाईल नंबरवरुन 9222201122 या नंबर व्हाट्स एप्प करावे लागणार आहे.

फक्त करा एक मेसेज - एचपी ग्राहकांना आपल्या नोंदणी झालेल्या मोबाईल क्रमांकावरुन कंपनीने दिलेल्या नंबरवरुन सिलिंडर बुक करता येईल. एची गॅस बुक असा मेसेज टाकल्यानंतर आपल्याला  बुकिंग संबंधित काही प्रश्न विचारले जातील. त्याला होय म्हणून उत्तर द्यायचे आहे. त्यानंतर आपला गॅस बुक होऊन जाईल.  ग्राहकांना व्हॉट्स एप्पवर एचपी गॅसशी संबंधित अधिक माहिती खालील पद्धतीद्वारे मिळू शकते-

एलपीजी कोटा (Quota) जाणून घेण्यासाठी, कोटाला (Quota)

9222201122 वर पाठवा

एलपीजी आयडी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही एलपीजीडला मेसेज करू शकता.

सबसिडी जाणून घेण्यासाठी सबसिडी लिहून पाठवा.

गॅस सिलिंडरसंदर्भात विविध माहिती मिळविण्यासाटी ग्राहक हेल्प असं लिहून पाठवू शकता.

English Summary: Book Your Gas Cylinders by WhatsApp on This Number; get Information on Subsidy Published on: 04 May 2020, 06:07 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters