1. बातम्या

शेतकऱ्यांनो सावधान बाजारात आली आहेत बोगस बियाणे; कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये

शेतकऱ्यांनो सावधान बाजारात आली आहेत बोगस बियाणे

शेतकऱ्यांनो सावधान बाजारात आली आहेत बोगस बियाणे

अमरावती : यावर्षीही शेतकऱ्यांवर बोगस बियाण्यांचं संकट दिसत आहे. गेल्यावर्षी अनधिकृत असलेल्या बोगस बियाण्यांमुळे (Uncertified seeds) शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. यंदा पुन्हा बियाण्यांचा काळाबाजार होत असल्याचे कृषी विभागाच्या कारवाईने उघड झाले आहे. अमरावती विभागात यंदा आतापर्यंत बोगस बियाण्यांच्या 6 कारवाया करण्यात आल्या आहेत.

यंदा विदर्भात मान्सून 15 जूनच्या अगोदर दाखल झाला आहे. पाऊस आल्याने बळीराजा देखील सुखावला आहे. 100 मिलीलीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलीय आहे. मात्र खरिपाच्या तोंडावर अमरावती जिल्ह्यातील अंजन्सिंगी येथे बीटी बियाण्याचे अप्रमाणित असलेले 1891 पॅकेट जप्त करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळणार नाही, असे धोरण कृषी विभागाने आखायला हवं, असा सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

गेल्यावर्षी अप्रमाणित बियाणे न उगवल्याने 2 हजाराच्या जवळपास शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यात शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान देखील झाले होते. परिणामी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यंदा अमरावती विभागात अमरावती व यवतमाळमध्ये बोगस बियाण्यांचा सुळसुळाट दिसून येत आहे.

 

बोगस बियाणांचा सुळसुळाट रोखण्यासाठी भरारी पथकं

त्याला आळा घालण्यासाठी जिल्हा तथा तालुकास्तरावर कृषी विभागाने भरारी पथक तयार केले आहे. तर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना त्याची पक्की बिल सोबतच बियाण्यांची किंमत अशा बाबी तपासून घेऊनच बियाणे खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

अमरावती विभागात झालेल्या कारवाया

गाव                जिल्हा        जप्त साठा रक्कम
मनोरा    वाशीम         2 क्विं.

5 लाख

चांदुर अमरावती 0.18 क्विं. 29 हजार
अंजनसिंगी अमरावती 8.5 क्वि. 14 लाख
वणी यवतमाळ 1.4क्विं. 1 लाख 85
राळेगाव यवतमाळ 0.11क्विं. 19 हजार
दारव्हा यवतमाळ 6 क्वि.  4 लाख 19 हजार

खरीप हंगामाच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी प्रयोगशाळांचे मोठे योगदान आहे. तपासणीसाठी येणारे खते, बियाणे यांच्या नमुन्यांची तपासणी विहित कालावधीत करावी. जेणेकरुन बियाणे जर सदोष असेल तर त्याचा प्रत्यक्षात वापर टाळू शकतो. जेणेकरुन शेतकऱ्यांचे नुकसान यामुळे होणार नाही. राज्यात गुणनियंत्रणाचे निकाल ऑनलाईन द्यावेत. त्याचबरोबर तपासणीसाठी नमुन्यांचे क्षमता वाढवावी, असं कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters