बँक ऑफ बडोदा (BOB) तर्फे राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पूणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे. या ठिकाणी प्रशासन विभागात सुपरव्हायझर पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यात येणार आहेत.
काय आहे शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, कॉम्प्युरची माहिती (एमएस ऑफीस, ईमेल, इंटरनेट) असणे गरजेचे आहे. असे असले तरी एमएससी (आयटी), बीई (आयटी), एमसीए, एमबीए यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवाराला मराठी भाषा खूप चांगल्या रितीने लिहीता, वाचता येणे गरजेचे आहे.
अनुभव
पब्लिक सेक्टर बॅंकमधून निवृत्त अधिकारी ते मुख्य मॅनजर असलेल्यांना अर्ज करता येईल. बॅंक ऑफ बडोदामधून रिटायर्ट क्लर्क, ग्रामीण बॅंकेतील कामाचा ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
पद भरतीवेळी उमेदवाराचे वय २१ ते ४५ वर्षांदरम्यान असणे गरजेचे आहे. सुपरव्हायजर पदासाठी वयोमर्यादा ६५ वर्षांपर्यंत आहे.
पगार
ज्या जिल्ह्यामध्ये भरती आहे तिथेच उमेदवाराला नोकरी मिळणार आहे. या पदाचा कालावधी सध्या १२ महिन्यांचा असून दर ६ महिन्यांनी कामाचा रिव्ह्यू घेतला जाणार आहे. या पदासाठी १५ हजारपर्यंत पगार देण्यात येणार आहे.
कुठे कराल अर्ज?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १३ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑफलाइन अर्ज सबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवायचा आहे. मूळ जाहिरातीमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्येच अर्जाचा नमुना देण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवाराने अर्ज भरुन दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेच्या आत पाठवायचा आहे.
Share your comments