Indapaur News : सोलापुरच्या उजनी धरणात माणसांना घेऊन जाणारी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. वादळी वाऱ्या सुटल्यामुळे बोटीची नियंत्रण सुटून ही बोट बुडाली होती. तर NDRF च्या पथकाने शोध मोहिम करुन १७ तासानंतर ही बोट शोधली आहे. मात्र अद्यापही बोटीतून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा शोध लागला नाही. यामुळे बोटीतून प्रवास करणारा सहा जणांना जलसमाधी मिळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे संबंधितांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
शोध मोहिम केल्यानंतर नदी पात्राच्या ३५ फूट तळाशी बोट सापडली आहे. मात्र बुडालेल्यांना शोधण्यात अद्याप NDRF ला यश आलेले नाही. यामुळे प्रवास करणाऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसंच या सर्वांना शोधण्याच काम देखील युद्धपातळीवर सुरु आहे.
बोट कुठून कुठे येत होती?
करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळाशी अशी ही बोट प्रवाशांना घेऊन येत होती. सायंकाळी अचानक वादळी वारा सुरु झाल्याने कळाशीच्या बाजूला पोहचत असताना बोट पाण्यातच उलटली. तसंच बोटीत प्रवास करणारे पोलीस उपनिरिक्षक राहुल डोंगरे यांनी पाण्यात उडी घेऊन पोहत कळाशी गावाचा काठ गाठला आणि स्थानिकांना बोट बुडाल्याची माहिती दिली.
हे सहा जण बेपत्ता
१) कृष्णा दत्तू जाधव २८ वर्ष
२) कोमल कृष्णा जाधव २५ वर्ष
३) वैभवी कृष्णा जाधव २.५ वर्ष
४) समर्थ कृष्णा जाधव १ वर्ष रा.झरे, ता. करमाळा
५) अनिकेत ज्ञानदेव अवघडे २१ वर्ष, रा. कुगांव, ता.करमाळा
६) गौरव धनंजय डोंगरे २१ वर्ष, रा.करमाळा
Share your comments