राज्यात बहुतांश भागात भात पिकाची लागवड केली जाते भात उत्पादक शेतकरी भात लागवडीतून चांगली मोठी कमाई देखील करत असतात. पुणे जिल्ह्यात देखील भाताची लागवड केली जाते येथील वेल्हे तालुक्यात भात लागवड लक्षणीय नजरेस पडते, म्हणून या तालुक्याला भाताचे आगार म्हणून संबोधले जाते.
वेल्हे तालुक्यात नुकतेच पारंपारिक भाताऐवजी काळ्या भाताची लागवड यशस्वीरीत्या करण्यात आली आहे आणि यातून चांगले उत्पन्नदेखील शेतकऱ्यांनी प्राप्त केले आहे. काळ्या तांदळात मुबलक प्रमाणात औषधी गुणधर्म आढळत असल्याने याचे सेवन मानवी आरोग्यासाठी फायदेशीर सिद्ध होते म्हणून दिवसेंदिवस काळ्या तांदळाला चांगला बाजारभाव प्राप्त होत आहे शिवाय याची मागणी देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे काळ्या भाताची लागवड भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. विशेषता पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या भात उत्पादक शेतकऱ्यांना याचा विशेष फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका विशेषता भात लागवडीसाठी संपूर्ण राज्यात ओळखला जातो. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने व तोरणा शेतकरी उत्पादक कंपनीच्या सहकार्याने येथे काळ्या भाताची लागवड यशस्वीरित्या करण्यात आली. तालुक्यातील चिरमोडी, मार्गासनी, वांगणी, वांगणीवाडी, अडवली, आस्करवाडी वाजेकर या गावात सुमारे वीस एकर क्षेत्रावर काळ्या भाताची लागवड करण्यात आली. या परिसरात चाको व कालीपत्ता या जातीचा काळा भात लावण्यात आला. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या परिसरात काळ्या भाताची लागवड एक प्रयोग म्हणून करण्यात आला होता.
मात्र हा प्रयोग यशस्वी झाला असल्याने भविष्यात काळ्या भाताच्या लागवडीची रूपरेखा या तालुक्यात आखण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. काळा तांदूळ हा साधारण तांदळापेक्षा खूपच महाग विकला जातो. या तांदुळाला प्रतिकिलो अडीचशे रुपयांपर्यंत बाजार भाव प्राप्त होत असतो. त्यामुळे काळा तांदूळ शेतकऱ्यांसाठी वरदान सिद्ध होणार असल्याची बतावणी कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्तींकडून केली जात आहे. या भाताची लागवड पारंपारिक भातशेती प्रमाणेच केली जाते. काळा तांदूळ 150 दिवसात काढणीसाठी तयार होत असल्याचे सांगितले जाते. कृषी वैज्ञानिकांच्या मते या भाताचे एकरी उत्पादन सुमारे 15 क्विंटलपर्यंत प्राप्त होऊ शकते.
या भाताचे उत्पादन हे साधारण भातापेक्षा साहजिकच कमी असते मात्र, या भाताला साधारण भातापेक्षा कितीतरी अधिक पटीने अधिक बाजारभाव प्राप्त होत असल्याने याची लागवड निश्चितच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नव्हे नव्हे तर राज्यातील ज्या भागात भात शेती केली जाते तेथील शेतकऱ्यांसाठी एक वरदान सिद्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Share your comments