काळ्या मिरीचे सेवन करा अन् वाढवा रोगप्रतिकारक शक्ती

25 March 2020 05:50 PM


कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील संशोधकाकडे एक चांगली बातमी आहे. ऑस्ट्रेलियातील कोरोनाच्या पहिल्या रुग्णाच्या शरीरातील प्रतिकारशक्तीने या संसर्गाचा कशाप्रकारे मुकाबला केला याचा अभ्यास केला आहे.  मानवी शरिरातील प्रतिकारशक्ती या विषाणूचा प्रतिकार करण्यास सक्षम असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.  आता रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याचा विचार तुम्ही करत आहात ना ? काळजी करू नका कारण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी काळी मिरी ही फार फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढली तर आपण या आजारापासून किंवा इतर दुसऱ्या व्हायरसच्या संक्रमणापासून लांब राहू शकतो.  आपल्या आहारात मसाल्याच्या पदार्थांना फार महत्त्व आहे. याच  मसालाचाच भाग असलेली वस्तू म्हणजे काळीमिरी.  काळ्यामिरीचा आपल्या आहारात उपयोग केला तर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.  घरी जेवणात थालीपीठ किंवा पराठे तयार करत असताना त्यात काळी मिरी घातली तर तुम्हाला वेगळी खाण्याची गरज राहणार नाही.  तसेच शरिरात रक्ताची कमतरता असेल किंवा पोट साफ होत नसेल तर काळ्या मिरीच्या सेवनाने पचनक्रिया व्यवस्थित राहते.  रोजच्या जेवणातील भाज्यांमध्ये मसाल्यांबरोबर काळी मिरी घालून तुम्ही आहारात याचा समावेश करु शकता. 

डाळीला फोडणी देतानाही तुम्ही काळी मिरी घालू शकता.  घरी असताना अनेकदा नाष्टा आणि स्नॅक्स आपण घरी असलेल्या पदार्थांपासून तयार करत असतो. अशावेळी सॅण्डविच किंवा सॅलेड कडधान्यांवर काळी मिरी घालून तुम्ही ते खाऊ शकता.  त्यामुळे तुमच्या गळ्यात होत असलेल्या इन्फेक्शनपासून दूर राहता येईल, तर  खोकल्याची समस्य़ासुद्धा दूर राहील.  बेसन आणि रवाच्या लाडू मध्येही तुम्ही काळीमिरी घालू शकता. काळीमिरीमुळे सर्दी, खोकला  दूर होतो, याशिवाय जर  ताप आला असेल तर  मधात मिरीचे चुर्ण मिसळून खाल्याने तापापासून  आराम मिळतो. सर्दीपासून बचाव करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रोज मध आणि काळी मिरी एक चमचा घ्यावा.

corona virus immune system black pepper कोरोना व्हायरस काळीमिरी रोगप्रतिकारक शक्ती
English Summary: black pepper helps to increased immune system

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.