जगभरात खाल्ल्या जाणार्या लोकप्रिय फळांचा विचार केला त्यातील एक सफरचंद आहे. सफरचंदात अनेक पोषक तत्वांसोबतच फायबरचे प्रमाणही जास्त असते. जर आपण सफरचंदांच्या रंगांबद्दल बोललो तर ते लाल, हिरवे आणि पिवळे असुन या सर्व सफरचंदांचे प्रकार आणि फायदे वेगवेगळे आहेत. पण यापैकी एक असे सफरचंद आहे ज्याबद्दल तुम्हाला कदाचितच माहिती असेल. या सफरचंदाचे नाव ब्लॅक डायमंड ऍपल आहे,आणि हे तिबेटच्या पर्वतांमध्ये आढळते. त्याचा रंग गडद जांभळ्यापासून काळ्यापर्यंत असतो. हे सफरचंद आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
ब्लॅक डायमंड सफरचंद आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही खूप फायदेशीर आहे. इतर सफरचंदांप्रमाणेच यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते, जे आतड्याच्या आरोग्यासाठी आणि पचनासाठी फायदेशीर आहे. याशिवाय काळ्या सफरचंदात व्हिटॅमिन सीसह अनेक आवश्यक पोषक घटक असतात. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. थेट सूर्यप्रकाश आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे या सफरचंदाचा रंग काळा होतो.
या फळाची दुर्मिळता आणि काळजीपूर्वक लागवड प्रक्रियेमुळे ब्लॅक डायमंड ऍपल महाग आहे. एका ब्लॅक डायमंड ऍपलची किंमत सुमारे 500 रुपये आहे. असे मानले जाते की हे लाल सफरचंदपेक्षा अधिक आरोग्यदायी आहे.याला अनेकदा लक्झरी फळांच्या श्रेणीत ठेवले जाते. या सफरचंदाचा विशिष्ट रंग आणि त्यातून मिळणारे फायदे हे त्याच्या लागवडीचे परिणाम आहेत.हे काळे सफरचंद दिसायला इतके चमकदार आहे की प्रत्येकजण त्याच्याकडे आकर्षित होतो.
Share your comments