नऊ हजार कोटी गेले वाया ! भाजपची जलयुक्त शिवार योजना ठरली अयशस्वी- कॅगचा अहवाल

09 September 2020 02:57 PM By: भरत भास्कर जाधवराज्यात मागील भाजप सरकारने जल शिवार योजना राबवली होती. परंतु ही योजना अयशस्वी ठरल्याचे शिकामोर्तोब  कॅगने केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या जलयुक्त शिवार योजनेत अनेक त्रुटी होत्या, त्रयस्थ संस्थेकडून त्याचे मूल्यमापन झाले नाही आणि नियोजनाअभावी गावांचा तेवढा फायदाही झाला नाही, असा ठपका ठेवतानाच ९,६३३ कोटी रुपये खर्चूनही भूजलातील पाण्याची पातळी वाढविण्यात अपयश आले, असे ताशेरे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) अहवालात ओढले आहेत.

ही योजना राबविल्याने ग्रामीण भागात पाण्याचा बराचसा प्रश्न सुटला, असा दावा के ला जात असे.  तसेच या योजनेमुळे राज्याच्या ग्रामीण भागाचे चित्रच बदलल्याचे चित्र उभे करण्यात आले होते. मंगळवारी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात जलयुक्त शिवार योजना यशस्वी होऊ शकली नाही, असेच मत नोंदविण्यात आले. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे आणि गावे दुष्काळमुक्त करण्याकरिता जलयक्त शिवार अभियान राबविण्यात आले होते. ही योजना राबविताना अनेक त्रुटी होत्या. गावांचा आराखडा बनविताना योग्य नियोजन झाले नाही. या योजनेच्या अंमलबजावणीकरिता निवडलेल्या बऱ्याच गावांमध्ये नियोजित साठवण क्षमता निर्माण के ल्या गेल्या नाहीत. कामांची गुणवत्ता तपासण्याकरिता त्रयस्थांकडून मूल्यमापन होणे आवश्यक होते.

अपुऱ्या निधीमुळे झालेल्या कामांची दुरुस्ती किंवा देखभाल होऊ शकली नाही. ९ हजार ६३३ कोटी खर्च करूनही भूजल पातळी वाढविण्यात आणि पाणी उपलब्ध करण्यात ही योजना यशस्वी होऊ शकली नाही, असे ताशेरे कॅगने अहवालात ओढले आहेत. हा योजनेच्या पारदर्शकतेचा अभाव होता, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले.

राज्यभर झालेल्या कामांचे त्रयस्थ संस्थांकडून मूल्यमापन करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. २०१५ ते २०१९ या काळात पूर्ण झालेल्या १ लाख ७४ हजार कामांपैकी के वळ ३७ हजार म्हणजेच फक्त २१ टक्के कामांचे त्रयस्थांकडून मूल्यमापन केले गेले. ’ २०१७-१८ मध्ये पूर्ण झालेल्या कामांमध्ये फक्त बुलढाणा जिल्ह्य़ाचा अपवाद वगळता अन्यत्र कोठेही त्रयस्थांकडून मूल्यमापन झाले नव्हते, असेही आढळून आले.

jalyukta shivar yojana cag report जलयुक्त शिवार योजना कॅगचा अहवाल भाजप सरकार bjp government
English Summary: BJP's jalyukt shivar yojana failed - cag report

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.