Mumbai News : मराठा आरक्षणाच्या मुद्याने आता रौद्र रुप धारण केलं आहे. राज्यभरातील अनेक गावात नेत्यांना गावबंदी करण्यात आली असून साथळी उपोषण सुरु झाले आहे. यातच आता राजीनामा सत्र सुरु झाले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे लक्ष्मण पवार हे पहिले आमदार आहेत.
मराठा आरक्षणासाठी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी देखील राजीनामा दिला आहे. त्यापोठापाठ सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रांझणी भिमाशंकरच्या सरपंच चंचला विजय पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता राज्यात सर्वत्र राजीनामा सत्र सुरु होते का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
आमदार प्रकाश सोळंकेंच्या घर आंदोलकांनी फोडले
राज्यात मराठा आंदोलन उग्र होत चालले आहे. बीड जिल्ह्यातील अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी दगडफेक केली आहे. त्याचबरोबर सोळंकें यांच्या घराबाहेर असलेल्या गाडीचीही जाळपोळ करण्यात आली. प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल टिप्पणी केल्यामुळे आंदोलक संतापले होते. त्यामुळे दगडफेक करत तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड
भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर भागाचे बंब आमदार आहेत. मराठा आंदोलकांकडून त्यांचे कार्यालय फोडण्यात आले आहे.
दरम्यान, सोलापुरात देखील मराठा समाजा आक्रमक झाला आहे. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला काळे फासल्याची घटना घडली आहे. पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरला काळे फासल्याची घटना घडलीये.
Share your comments