मुंबई: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाच्या आघाडीचे सरकार स्थापन झाले. आता स्थानिक पातळीवरील सत्ता समीकरणेही झपाट्याने बदलत असून त्याचा फटका भाजपला बसत आहे. भाजपला विधानसभेनंतर आता स्थानिक पातळीवरील निवडणुकीतही पराभवाची चव चाखावी लागत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला असून यात भाजपचा पराभव झाला.
राज्यात सत्ता असताना भाजप सर्व छोटी-मोठी सत्तास्थाने ताब्यात घेतली होती. मात्र सत्ता गेल्यानंतर हे चित्र उलट झाले आहे. काही जिल्हा परिषदानंतर आता अत्यंत महत्त्वाच्या अशा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतही भाजपचा पराभव झाला आहे. बाजार समितीच्या सर्व विभागांवर महाविकास आघाडीवर वर्चस्व राखले आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ३४ जिल्ह्यांमधून यंदा सुमारे ९३ टक्के मतदान झाले होते. सहा महसूल विभागांमधून १२ शेतकरी व चार व्यापारी प्रतिनिधी निवडण्यासाठी हे मतदान झाले. एकूण ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र खरी लढत महाविकास आघाडी व भाजपच्या उमेदवारांमध्ये होती, यात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे.
Share your comments