सध्या देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. असे असताना काही दिवसांपूर्वी देशात कृषी कायद्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी असा संघर्ष बघायला मिळाला. दिल्लीत अनेक महिने याविरोधात शेतकरी आंदोलन करत होते. शेतकऱ्यांपुढे मोदी सरकारने हार मानून हे कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. या आंदोलनात उत्तर भारतातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता. यामुळे सध्याच्या निवडणुकीत याचा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचे जीव देखील गेले होते. यामुळे आता देखील शेतकरी केंद्र सरकारवर चिडून आहेत.
या निवडणुकीत भाजपचे अनेक आमदार भाजपला रामराम करत पक्ष सोडून गेले आहेत. तसेच उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन कोरोना हे मुद्दे विरोधकांच्या प्रचाराच्या अग्रस्थानी असणार आहेत, यामुळे ही निवडणूक भाजपला जड जाण्याची शक्यता आहे. अखिलेश यांनी या निवडणुकीत जोरात तयारी करून भाजपचे अनेक आमदार फोडले आहेत. यामुळे रंगत वाढली आहे. तसेच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी देखील राज्यात लक्ष दिले असून प्रचार सुरु आहे. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची लढाई ही रंगतदार स्थितीत पोहोचली आहे.
दरम्यान, समोर येत असलेल्या माहितीमधून उत्तर प्रदेशात भाजपा आणि समाजवादी पक्षामध्ये थेट लढत होत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुमताचा आकडा २०२ आहे. महापोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मात्र हा केवळ अंदाजच आहे. आता नेमका विजेता कोण ठरेल हे १० मार्च रोजी निकालांमधूनच समोर येणार आहे. असे असले तरी विरोधकांनी अनेक प्रश्नावरून योगी सरकारला टार्गेट केले आहे.
तसेच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप जाहीर केलेला नाही. असे असले तरी प्रियंका गांधी याच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असण्याची चर्चा रंगली आहे. त्यातच प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सूचक विधान केले आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल असा प्रश्न प्रियंका गांधी यांना विचारला. त्यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसकडून दुसरा कोणता चेहरा दिसतोय का असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे आता निकालात काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Share your comments