भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन ४५ निश्चित केले आहे. या मिशनची सुरुवात शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतून होणार आहे. भाजपने महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांना सोपवली आहे.
2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात अनेक बडे नेते बारामतीला भेटी देणार आहेत. याची सुरवात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापासून होत आहे. निर्मला सीतारामन सप्टेंबर महिन्यातील 22,23 व 24 तारखेला बारामतीला भेट देणार आहेत.
मोठी बातमी: भाजपकडून मुंबईत दंगल घडवण्याचा प्रयत्न; शिवसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
"अमेठीचा किल्ला आम्ही जसा सर केला तसा यंदा बारामतीचा किल्ला सर करणार. 2014 साली आम्ही अमेठीत हरलो होतो पण आमच्या सातत्यपूर्ण कामगिरीने आम्ही 2019 ला यश मिळवले. राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ शोधला होता. पण आता सुप्रिया सुळे यांनीही त्यांचा 'वायनाड' शोधावा.
कारण आता बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून नियोजन सुरु आहे, यंदा काहीही झालं तरी बारामतीचा गड सर करणारच", असा आत्मविश्वास भाजप नेते आणि बारामतीच्या प्रभारीपदाची जबाबदारी असणारे राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
IMD Alert: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय; या भागात यलो अलर्ट
पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की, "अमेठीमध्ये 2014 साली आम्हाला पराभवाचा धक्का बसला. पण त्यानानंतरही आम्ही थांबलो नाही. आमचे प्रयत्न आम्ही सुरुच ठेवले. पण आम्हाला 2019 ला यश मिळालंच.
राहुल गांधी पराभूत होतील, असं कोणालाही वाटत नव्हतं पण भाजपने त्यांना पराभूत करुन दाखवले. ए फॉर अमेठी मिशन सक्सेसफूल झालं, आता बी फॉर बारामतीचं मिशन आम्हाला साध्य करायचं आहे. आम्ही 2014 आणि 2019 ला हरलो पण आता २०२४ ला कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच"
भाजपचे वरिष्ठ नेते पुढच्या काही दिवसांत बारामती दौऱ्यावर येणार आहे. त्याच दौऱ्याच्या नियोजनासाठी इंदापूरच्या अर्बन बँकेच्या सभागृहात प्रभारी राम शिंदे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली.
या बैठकीला किसन मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पृथ्वीराज जाचक आदी नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर राम शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून दौऱ्याची सखोल माहिती दिली.
Share your comments