1. बातम्या

मध्यप्रदेश , राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेशात आला बर्ड फ्लू; अनेक राज्यात अलर्ट, अंडे विक्रीला बंदी

देशातील कोरोनाचे संकट सावरले नसतानाच आता आणखी एका संकटाने प्रवेश केला आहे. हे संकट कोंबड्यांवर बर्ड फ्लूचे आले असून याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना आणि मांस प्रेमींना बसणार आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेशातील केरळ या राज्यांमध्ये हा बर्ड फ्लू आला आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
Bird flu  in Madhya Pradesh

Bird flu in Madhya Pradesh

देशातील कोरोनाचे संकट सावरले नसतानाच आता आणखी एका संकटाने प्रवेश केला आहे.  हे संकट कोंबड्यांवर बर्ड फ्लूचे आले असून याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना आणि मांस प्रेमींना बसणार आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेशातील केरळ या राज्यांमध्ये हा बर्ड फ्लू आला आहे. मागील दिवसात या राज्यात  शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.

 दरम्यान यानंतर सर्तकता बाळगत हिमाचल प्रदेशात मासे, कोंबड्या आणि अंड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान सर्व राज्यातील शासनाने अलर्ट जारी केला आहे, शिवाय परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. बिहार, झारखंड व उत्तराखंडाच्या राज्यातील शासनाने सतर्कता बाळगली आहे.

हेही वाचा :हिवाळ्यात शेडमधील कोंबड्यांची कशी घ्याल काळजी; वाचा संपुर्ण माहिती

या आजाराचा कोंबड्यांच नाहीतर माणसांवरही परिणाम होतो.  या रोगाने पीडित असलेल्या पक्ष्यासोबत राहिल्यामुळे माणसांही याची लागण होते. या आजाराचा विषाणू डोळे, तोंड, आणि नाकाच्या माध्यमातून शरिरात प्रवेश करत असतो. मध्य प्रदेशात बर्ड फ्लूचे प्रकरणाची सुरुवात  आधी इंदौर शहरातून झाली होती. येथे मागील एका आठवड्यात डेली कालेज परिसरात १४८  कावळ्यांचा मृत्यू झाला होता. यातील दोन मृत कावळ्यांना भोपाळ येथील सिक्योरिटी लॅब मध्ये पाठविण्यात आले. तेथे या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निष्पन झाले.

 

दरम्यान राजस्थानात बर्ड फ्लूच्या  कारणामुळे कावळे मृत होत आहेत.मध्य प्रदेशात आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक कावळ्यांचा मृत्यू  झाला आहे. दरम्यान राज्यपाल कलराज मिश्र यांनी राज्य सरकारच्या कृषी मंत्री लालचंद कटारियाकडून बर्ड फ्लू वर नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती मागितली आहे.

 

हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील अंतरराष्ट्रीय रामसर वेटलँड पाँग बांध येथे परदेशी कबुतरांचा मृत्यू बर्ड फ्लू झाला आहे.  भोपाळमधील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा  पशुरोग संस्थेने याविषयी अहवाल दिला आहे. परदेशी कबुतरांचा मृत्यू हा एच५ एन१ फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.

English Summary: Bird flu has hit Madhya Pradesh, Rajasthan, Punjab, Himachal Pradesh, alert states have banned the sale of eggs Published on: 05 January 2021, 05:35 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters