1. बातम्या

बर्ड फ्लूमुळे अंड्यांचे भाव पुन्हा घसरले

कोरोनाने गेल्या बर्‍याच दिवसांपासून जगात धुमाकूळ घातला होता, अजूनही कोरोनावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. आजपासून महाराष्ट्रात कोरोनाची लसीकरण सुरू होत आहे. एक दिलासादायक बाब आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
egg prices fall

egg prices fall

कोरोनाने गेल्या बर्‍याच दिवसांपासून जगात धुमाकूळ घातला होता, अजूनही कोरोनावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. आजपासून महाराष्ट्रात कोरोनाची लसीकरण सुरू होत आहे. एक दिलासादायक बाब आहे. परंतु कोरोनाची चिंता कमी होत नाही, तोपर्यंत बर्ड फ्लूने डोके वर काढले.त्यामुळे सगळीकडे वातावरण चिंताग्रस्त झाले आहे.

बर्ड फ्लूचा प्रभाव हा प्रमुख यांनी पोल्ट्री उद्योगावर पडतो. याच पार्श्वभूमीवर दिल्लीमधील उत्तर महानगरपालिकेने अंडी आणि चिकन यासंदर्भात नवीन आदेश जारी केला आहे. आता दिल्लीच्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये अंडी आणि चिकन दिली जाणार नाहीत. या नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे. बर्ड फ्लूचा प्रसार थांबविण्यासाठी दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यवसाय यांचा खर्च निघणेही मुश्‍कील झाले आहे. ही परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर देशातील बरेचशे पोल्ट्री फार्म बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये अंड्यांच्या भावात मोठी घसरण झाल्याने देशभरातील पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

 

हेही वाचा : बर्ड फ्लूचं संकट; पोल्ट्री उद्योगाला दररोज होतय ७० कोटी रुपयांचे नुकसान

भारताचा विचार केला तर जवळ-जवळ दहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूची प्रकरणे आढळली आहेत. बर्ड फ्लू आता महाराष्ट्रातही दाखल झाला आहे. गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेशमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार झाला होता. बर्थडेला आळा घालण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. बर्ड फ्लूमुळे अंड्याची किमतीत सातत्याने घसरण होत असल्याने पोल्ट्री व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. गुरुवारी अंड्याचा दर २९५ रुपये प्रति शेकडा वर आला आहे. पोल्ट्री व्यावसायिकांकडून अंडी अडीच ते तीन रुपयात खरेदी केले जात आहे.

 

अंड्याच्या किमतीचा विचार केला तर अंडी पोल्ट्री फार्मपासून विक्रेत्यांच्या दुकानात येईपर्यंत त्यांच्या किमतीत जवळ-जवळ चारवेळा बदल होतो. प्रथम त्यांचा दर राज्यानुसार ठरवले जातात. घाऊक विक्रेता आणि किरकोळ विक्रेता एकत्रितपणे दरासंदर्भात निर्णय घेतात. त्यानंतर ही अंडी ग्राहक आणि आपल्या स्वयंपाक घरात पोहोचतो. पोल्ट्री फार्ममधून अंडी मोठ्या घाऊक विक्रेतापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्यावर वाहतूक आणि कामगार कधी खर्च पकडून फक्त १५ ते २० रुपयांचा नफा शंभर अंड्या मागे होत असतो.

English Summary: Bird flu caused egg prices to fall again Published on: 16 January 2021, 03:27 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters