शेनापासून रंगनिर्मिती करण्याच्या उद्योगाला अगोदर चालना देण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर बिहार सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देईल अशी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केले आहे.
या योजनेच्या माध्यमातून बिहार सरकार हे शेतकरी आणि पशुपालकांकडून ठोस अशा किमतीमध्ये शेनाची खरेदी करणार आहे आणि या खरेदी केलेल्या शेणापासून मिथेन गॅसची निर्मिती करण्यात येणार आहे. या योजनेला गोवर्धन योजना असे नाव देण्यात आले आहे. यासाठी शेतकरी आणि पशुपालकांकडून खरेदी करण्यात आलेल्या शेणापासून मिथेन गॅस तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक प्लांट उभारला जाईल व या प्लांटची जबाबदारी एका एजन्सीला देण्यात येणार आहे. गोवर्धन योजनेच्या माध्यमातून बिहारची ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होऊन शेतकरी व पशुपालकांची मध्ये भरभराट येईल अशी राज्य सरकारची अपेक्षा आहे.
यासंबंधित टीव्ही नाईन ने दिलेल्या बातमीनुसार मिथेन गॅस तयार करण्यासाठी प्लान्ट उभारण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली आहे. या प्लांटसाठी लागणाऱ्या जमिनीची निवड ही जिल्हा प्रशासन करणार आहे.यासाठी बहुतेक जिल्ह्यांमध्ये प्लांटसाठी जमीन निवडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या 2025 पर्यंत बिहारच्या सर्व जिल्ह्यांमधील प्लांट मधून उत्पादन सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
या प्रक्रियेमध्ये प्लांट मधून जो काही कचरा तयार होईल त्यापासून वर्मीकंपोस्ट तयार केले जाईल. वर्मी कंपोस्ट चा उपयोग हा सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.त्यामुळे या प्लांटचे कचऱ्यापासून तयार होणाऱ्या गांडूळ कंपोस्ट पासून शेतकऱ्यांना खताची उपलब्धता होणार आहे व त्यासोबतच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळणार आहे.
Share your comments