भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांनी पीएम किसान सम्मान निधि योजने अंतर्गत या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील जवळपास अकरा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा दहावा हफ्ता देऊन नववर्षाचे मोठे गिफ्ट दिले होते. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे केंद्र सरकारने एक जानेवारी रोजी पीएम किसान सम्मान निधि योजनेचा दहावा हफ्ता देशातील जवळपास अकरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला होता. राज्यातील जवळपास एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना देखील या योजनेचा दहावा हफ्ता देण्यात आला आहे.
जर आपणही पीएम किसान सम्मान निधि योजनेसाठी पात्र असाल आणि अद्यापही आपल्या खात्यात या योजनेचा दहावा हफ्ता वर्ग करण्यात आला नसेल तर आपणास या योजनेच्या हप्त्याचे स्टेटस जाणून घ्यावे लागेल नाहीतर आपणास या योजनेचा अकराव्या हफ्त्यापासूनही वंचित रहावे लागू शकते. केंद्र सरकारने नुकतेच पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या अकराव्या हफ्त्याविषयी मोठी माहिती जारी केली आहे.
काय आहे पीएम किसान सन्मान निधी योजना
देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना हे सहा हजार रुपये वर्षात एकूण तीन हप्त्यात दिले जातात. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने वार्षिक तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत आगामी काही दिवसात अकरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
प्रसारमाध्यमानुसार, या योजनेचा अकरावा हप्ता एप्रिल महिन्यात येऊ शकतो याआधी या योजनेचा दहावा हफ्ता 1 जानेवारी 2022 रोजी पात्र शेतकऱ्यांना देण्यात आला होता. हा दहावा हफ्ता देशातील जवळपास अकरा कोटी शेतकऱ्यांना दिला गेला होता. यासाठी सरकारने तब्बल 21 हजार करोड रुपये एवढी घसघशीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली होती. या योजनेच्या अकराव्या अपत्यासाठी शासन दरबारी जवळपास सर्व प्रक्रिया पूर्णत्वास येताना दिसत आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे एक कोटी पाच लाख शेतकऱ्यांना अकरावा हप्ता प्राप्त होणार आहे.
शेतकरी मित्रांनो जर आपणास या योजनेचा दहावा हफ्ता मिळाला नसेल तर आपणास या योजनेचा अकरावा हप्ता देखील मिळणार नाही त्यामुळे जर आपणास या योजनेचा दावा आत्ता मिळाला नसेल तर आपण खालील नंबर वर तक्रारी दाखल करू शकता.
पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
पीएम किसान लँडलाइन क्रमांक: ०११-२३३८१०९२, २३३८२४०१
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606
पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109 किंवा आपण pmkisan-ict@gov.in या पीएम किसानच्या ऑफिशियल ई-मेल आयडीवर ई-मेल दाखल करून तक्रार करू शकता.
Share your comments