सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांत दरम्यान घमासान युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम हा जागतिक पातळीवर होताना दिसत आहे. याचा परिणाम जागतिक अन्नधान्य बाजारावर देखील झाला असून मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आहे.
परंतु या निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा भारतातील गहू उत्पादक शेतकऱ्यांना आणिव्यापाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. अगोदरच आपल्याकडे गव्हाची गोदामे भरगच्च भरले असून त्याचा जाता रब्बी हंगामातील गव्हाची काढणी सुरू झाल्याने यामध्ये आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेले गोदामातील गहू निर्यात करण्याची ही मोठी संधी आहे.
नक्की वाचा:सावधान! तुम्ही ही ऑनलाइन कर्ज घेतात? तर सावधान ऑनलाइन लोन घेणाऱ्यांना केल जातय ब्लॅकमेल
युक्रेन व रशिया आहेत गव्हाचे मोठे निर्यातदार
अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीचा जर आपण विचार केला तर जून 2021 ते मे 2022 या चालू वर्षात गहू चा एकूण व्यवहाराचा विचार केला तर यूक्रेन 10 टक्के तर रशिया 16 टक्के निर्यात करण्याची शक्यता आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेन मधून होणारी आंतरराष्ट्रीय वाहतूक काही दिवसांपासून बंदच आहे आणि दुसरीकडे रशियावर अनेक युरोपियन देशांनी आर्थिक निर्बंध लादले आहेत
त्यामुळे त्याचा थेट परिणाम हा जहाज वाहतुकीवर दिसून येत असलेली देशातून होणारी निर्यात देखील विस्कळीत झाली आहे.
भारतातील गव्हाच्या उत्पादनाचा अंदाज
भारतात यंदा गव्हासाठी खूप पोषक वातावरण होते. त्यामुळे गहू उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असून एकट्या रब्बी हंगामात ते दहा कोटी 76 लाख टनांच्या आसपास जाऊ शकते. त्यापैकी 17 लाख पाच हजार टन निर्यात झाली तर आधीच शिल्लक असलेल्या गव्हाचा विचार करता देशात दोन कोटी 70 लाख टन गहू शिल्लक राहण्याचा अंदाज आहे.
या युद्धजन्य परिस्थितीमुळे एकूणच जागतिक बाजारपेठेत गव्हाचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे गव्हाच्या किमतींमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. जरा आपल्या भारतीय अन्न महामंडळाच्या विचार केला तर या महामंडळाकडे एप्रिलपर्यंत 70 लाख 46 हजार टन गहू शिल्लक राहण्याचा एक अंदाज होता.
परंतु मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दोन कोटी 34 लाख टन गहू शिल्लक आहे. त्यामुळे भारतातून एक कोटी 50 लाख टन गव्हाची निर्यात होणे शक्य आहे. या युद्धामुळे जागतिक गहू बाजारामध्ये 26 टक्क्यांची कमतरता निर्माण झाली असून ही कमतरता भरून गहू निर्यातीत भारताला फायदा करून घेता येणे खूप शक्य आहे.
Share your comments