
Uddhav Thackeray
मुंबई : सर्वात मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. कायदेशीर लढाईत अपयश आल्यास नव्या चिन्हासाठी तयार रहा, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसैनिकांनो नव्या चिन्हासाठी तयार राहा"; असे विधान उद्धव ठाकरें केले आहे.
शिंदे गटाने बंडखोरी करत भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन केले. आणि आता शिंदे गटाने धनुष्यबाण या चिन्हावार दावा केला आहे. शिंदे गटाने धनुष्यबाण या चिन्हावार दावा केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या चिन्हाची तयारी ठेवा असे आवाहन केले आहे. शिवसेनेला मिळणार चिन्ह कमी कालावधीत घरा घरात पोहचवा असेदेखील ठाकरे यांनी म्हटले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ विस्ताराचे ठरलं तर..! पाहा कसा असणार फॉर्म्युला?
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात केली आहे.उद्धव ठाकरे यांनी कायद्याच्या लढाईत अपयश आल्यास पक्षाच्या नव्या चिन्हाची तयारी ठेवा. जे नवे निवडणूक चिन्ह येईल ते स्वीकारून लवकरात लवकर त्याची पूर्वतयारी करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.
“माझी प्रकृती ठीक असल्याने आता आम्ही शिवसेना भवनात दररोज उपलब्ध आहोत,” असे सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांना विरोधकांशी हस्तांदोलन करण्यास तयार असल्याचे संकेत दिले.
दिलासादायक ! खाद्यतेल स्वस्त होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय
Share your comments