सध्या गणेश उत्सव एका दिवसावर येऊन ठेपला आहे. यामुळे सगळ्यांची तयारी सुरु आहे. असे असताना आता पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यात 31 ऑगस्टपासून 9 सप्टेंबरपर्यंत दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. यामुळे या काळात तुम्हाला दारू मिळणार नाही.
गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी मोठ्या प्रमाणावर दारु विक्री होत असते. त्यामुळे या उत्सवाला गालबोट लागण्याची शक्यता असते. अनेक ठिकाणी मोठमोठ्या मिरवणूका काढल्या जातात. यामुळे दारू पिऊन आलेल्या लोकांकडून अनेकदा चुकीच्या घटना घडतात. यामुळे याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात दारु विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. यामुळे आता हा सण शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यामुळे देखावे आणि इतर कार्यक्रम देखील सर्वांना व्यवस्थित बघता येणार आहेत.
बारामती ॲग्रोच्या अडचणी वाढण्याची शक्यता, तानाजी सावंत यांनी भरले कारखान्याचे 9 कोटी...
दरम्यान, आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन काही तासांवर आले आहे. सगळेजण या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. कोरोनाच्या सावटानंतर हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. यामुळे यामध्ये काही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.
महत्वाच्या बातम्या;
दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचा देशपातळीवर सन्मान, शरद पवारांकडून कौतुक
केंद्र सरकारची मोठी घोषणा! कृषी पायाभूत सुविधांसाठी दिली 14 हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
हवामानात मोठा बदल! आजपासून 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात, पंजाबराव डख यांची माहिती..
Share your comments