1. बातम्या

मोठी बातमी! आता शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस अजित पवारांविरोधात हक्कभंग आणण्याच्या तयारीत..

मुंबई, सध्या राज्यात कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. याचे पडसात सध्या सभागृहात उमटत असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी यामुळे राज्य सरकारला इशारा दिला आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
electricity

electricity

मुंबई, सध्या राज्यात कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. याचे पडसात सध्या सभागृहात उमटत असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी यामुळे राज्य सरकारला इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले होत की, कृषी पंपाचे चालू बील भरलं तरी विजपुरवठा खंडीत केला जाणार नाही. मग आता वीज कनेक्शन का कट करत आहेत असा सवाल फडणवीस यांनी केला. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

वीज कट करणार नाही, अशी घोषणा करा असे ते म्हणाले. मंत्री महोदय दिशाभूल करत आहेत, हा चालूपणा चालणार नाही. नाहीतर आम्ही अजित पवारांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला. यामुळे आता अजित पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सरकारमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. सध्या राज्यात सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी सुरु असल्याचे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सुरज जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केली. मला पुन्हा शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाही. या सरकारला शेतकऱ्याची काळजी नाही असे म्हणत फेसबुक लाईव्ह करत त्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे फडणवीस म्हणाले.त्यांच्या घरच्यांनी ज्यावेळी पिकाला पाण्याची आवश्यकता होती, त्यावेळी कृषीपंपाची वीज कट केली असल्याचे सांगितले, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

तसेच बीडमध्ये देखील एका शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्याचेही कृषी पंपाचे कनेक्शन कापले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अनेक शेतकरी आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत. मागील अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, आम्ही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज कट करणार नाही. मात्र, उपमुख्यमंत्र्यांचे ऊर्जामंत्री ऐकत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यामुळे आता येणाऱ्या काळात हा मुद्दा अजूनच गाजणार आहे.

English Summary: Big news! Now Devendra Fadnavis is preparing to bring a breach of rights against farmers for Ajit Pawar. Published on: 08 March 2022, 12:46 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters