1. बातम्या

आनंदाची बातमी !६५ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार वाढीव पेन्शन ; सरकारचा निर्णय


कोरोना संकटाच्या काळात कर्मचारी भविष्य निधी संघटनांकडून पेन्शनधारकांना आनंदाची बातमी दिली आहे.  निवृत्तीधारकांना वाढीव पेन्शन मिळणार आहे.  सोमवारी ईपीएफओने बदलेली मूल्य पुनर्संचयित करण्यासाठी एकूण ९७३ कोटी जारी केले आहेत.  या पेन्शनसाठी ८६८ कोटी रुपये तर थकबाकी म्हणून १०५ कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत.  केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या शिफारशीवर आधारित कामगारांची अनेक वर्षांची मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे.  या अंतर्गत कामगारांना १५ वर्षानंतर निवृत्तीवेतनाचे बदललेले मूल्य पूर्ववत करण्याची परवानगी देण्यात आली.  आतापर्यंत पेन्शन पुनर्संचयित करण्याची कोणतीही तरतूद नव्हती त्यामुळे निवृत्तीधारकांना कमी पेन्शन मिळत असे.  केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून ईपीएफओ ९५ च्या अंतर्गत पेन्शन धारकांच्या हितासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

ही सुविधा त्या नागरिकांसाठी आहे ज्यांनी २५ सप्टेंबर २००८ ला किंवा त्याआधी याचा पर्याय निवडला होता.  पेन्शन कम्युटेशनच्या नुसार, पेन्शनमध्ये १५ वर्षापर्यंत एक तृतीयांशने कपात होते.  आणि कमी केलेली रक्कम एकरकमी दिली जाते. पंधरा वर्षानंतर निवृत्तीवेतनधारक पुर्ण रक्कम घेण्याचा हक्कदार असतो.  ऑगस्ट या कोरोना संकट काळात ईपीएफओकडून मे २०२० पासून निवृत्तीधारकांच्या बँक खात्यात वाढीव रक्कम अदा करण्यात येणार आहे.  दरम्यान केंद्रीय विश्वस्त मंडळाची वर्ष २०१९ मध्ये २१ ऑगस्ट रोजी बैठक झाली होती.  त्यामध्ये त्यांना २६ सप्टेंबर २००८ पूर्वी निवृत्त झालेल्यांची पूर्ण मासिक पेन्शन १५ वर्षानंतर पुनर्संचयित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती.

फायदा कसा होणार

निवृत्तीच्या वेळी ५ हजार रुपये पेन्शन लागू असलेल्या कर्मचाऱ्याने जर निवृत्ती वेतनाच्या एकूण रक्कमेपैकी एक तृतीयांश रक्कम काढून घेतली, तर त्यांना पेन्शन मिळत होती.  पंधरा वर्ष ही पेन्शन घेतल्यानंतर यापुढे दर महिन्याला त्यांना मुळ रक्कम म्हणजेच पाच हजार रुपये पेन्शन मिळू शकेल.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters