1. बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे यांनी सोडले उपोषण, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली मोठी घोषणा...

गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. दोनदा जीआर काढण्यात आल्यानंतरही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नव्हता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी गेले आहेत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Manoj Jarange broke his hunger strike

Manoj Jarange broke his hunger strike

गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. दोनदा जीआर काढण्यात आल्यानंतरही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नव्हता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी गेले आहेत.

आता मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवलं आहे. यामुळे आता आरक्षणाच काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील ही पहिली घटना आहे म्हणून त्यांनी कौतुक केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आरक्षणात लक्ष्य घालून उपोषण सोडवण्यासाठी आले आहेत. मराठा समाजाला एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात.

तसेच आरक्षण दिल्याशिवाय ते मागे हटणार नाहीत. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांकडून आशा आहे. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात आहे, असे म्हणत जरांगे यांनी देखील लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी मागणी केली आहे.

मराठा समाजासह अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले आहेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते.

English Summary: Big news! Manoj Jarange broke his hunger strike, made a big announcement in the presence of the Chief Minister... Published on: 14 September 2023, 11:26 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters