काही दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी राजीनामा दिला होता. असे असताना आता अध्यक्षपदी अॅड. केशवराव जगताप यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच उपाध्यक्षपदी तानाजी देवकाते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तालुक्यात कारखान्याचा नवा कारभारी कोण होणार याकडे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांसह, बारामती तालुका, जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याबाबत आता त्यांच्या संमतीने निर्णय घेण्यात आला आहे. या पदासाठी सुरुवातीपासूनच अॅड.केशवराव जगताप, मदननाना देवकाते, सुरेश खलाटे, योगेश जगताप हे संचालक इच्छुक होते.
दरम्यान, कारखान्याची निवडणूक दीड वर्षावर येऊन ठेपली आहे. इच्छुक असलेल्या चारही उमेदवारांच्या शेकडो समर्थकांनी मुंबईला जाऊन अजित पवार यांच्याकडे आमचाच उमेदवार अध्यक्ष झाला पाहिजे अशी गळ घातली होती.
आमचा नेता कसा सक्षम आहे हे पटवून देत त्यांनाच संधी मिळाली पाहिजे, असे साकडे घातले होते. आता येणाऱ्या काळात ते कसे कारभार करणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
Share your comments