1. बातम्या

Krishi Sevak Bharti : सरकारची मोठी घोषणा! कृषी विभागात मेगा भरती

महाराष्ट्र शासनाने कृषी विभागात बंपर भरती जारी केली आहे. जर तुम्ही कृषी विषयक शिक्षण घेतलेले असेल तर तुम्हाला नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. अर्ज करा आणि सरकारी नोकरी मिळवा. विभागाने कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक भरती 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. कृषी विभागातील 2000 हून अधिक रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
Krishi Sevak Mega Recruitment

Krishi Sevak Mega Recruitment

महाराष्ट्र शासनाने कृषी विभागात बंपर भरती जारी केली आहे. जर तुम्ही कृषी विषयक शिक्षण घेतलेले असेल तर तुम्हाला नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. अर्ज करा आणि सरकारी नोकरी मिळवा. विभागाने कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक भरती 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. कृषी विभागातील 2000 हून अधिक रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या महत्त्वाच्या भरती मोहिमेचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्रात कृषी सेवकांच्या एकूण 2070 रिक्त पदे ऑनलाइन CBT परीक्षेद्वारे भरणे आहे. यामुळे एकीकडे शेतीचे काम सोपे होईल आणि दुसरीकडे पात्र तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळतील. सरकारच्या या उपक्रमामुळे कृषी क्षेत्रात मोठे बदल घडतील,अशी अपेक्षा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 ऑक्टोबर आहे. पात्र उमेदवार संबंधित पदांसाठी महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइट krishi.maharashtra.gov.in वर अर्ज करू शकतात.

कोणत्या जिल्ह्यात किती पदे ?
ठाणे कृषी सेवक: 294 पदे
नाशिक कृषी सेवक: ३३६ पदे
कोल्हापूर कृषी सेवक: 250 पदे
नागपूर कृषी सेवक: ४४८ पदे
पुणे कृषी सेवक: 188 पदे
लातूर कृषी सेवक: 170 पदे
छत्रपती संभाजी नगर कृषी सेवक : १९६ पदे
अमरावती कृषी सेवक: 227 पदे
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
शैक्षणिक पात्रता: शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी.
वयोमर्यादा –
सर्वसाधारण प्रवर्ग – १८ ते ४० वर्षे. मागास प्रवर्ग – १८ ते ४५ वर्षे.

अर्ज फी –
खुला प्रवर्ग – १००० रुपये. मागासवर्गीय – ९०० रुपये.
पगार – उमेदवारांना महिना १६ हजार पगार मिळणार आहे.
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.
महत्वाच्या तारखा –
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – १४ सप्टेंबर २०२३.अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०२३.
अधिक माहितीसाठी अर्जदारांनी महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइट krishi.maharashtra.gov.in वर जावे.
इफकोनेही भरती जाहीर केली आहे -
खत निर्मिती कंपनी इफकोनेही कृषी क्षेत्रातील पदवीधरांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार कृषी पदवीधर प्रशिक्षणार्थी AGT साठी IFFCO च्या अधिकृत वेबसाइटवर (https://agt.iffco.in/) 7 ऑक्टोबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी उपलब्ध असलेल्या विहित अर्जाद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी शैक्षणिक पात्रता चार वर्षांची B.Sc कृषी आहे. यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पूर्णवेळ नियमित पदवी आवश्यक आहे.

English Summary: Big News Krishi Sevak Mega Recruitment Government Announcement Published on: 29 September 2023, 05:58 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters