शेतकरी नेते आणि माजी आमदार पाशा पटेल (Pasha Patel) यांना पुत्रशोक झाला आहे. आज सकाळी पाशा पटेल यांचे पुत्र ॲड. हसन पटेल (Hasan Patel) यांचं निधन झालं आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, वयाच्या 38 व्या वर्षी हसन पटेल यांचे निधन झाले.
लातूरमध्ये रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची मूत्यूशी सुरु असलेली झुंज संपली आहे. आज दुपारी दोन वाजता लोदगा येथे त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आमदार पाशा पटेल हे शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेकदा आवाज उठवला. त्यांनी अनेक आंदोलने केली.
हसन पटेल यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. ते मुंबई हायकोर्टात वकिली करत होते. लॉकडाऊनमध्ये ते लातूरमध्ये आले होते. तेव्हापासून ते तेथेच होते. त्यानंतर प्रकृती अस्वस्थतेमुळं ते लातूरमध्ये होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लातूमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, अखेर आज त्यांचे निधन झाले आहे.
शरद पवारांच्या नातीचा परदेशात डंका! युरोपमध्ये घुमणार बारामतीचा आवाज, बातमी वाचून कराल कौतुक..
ॲड. हसन पटेल यांना मागील काही दिवसांपासून ह्दयाच्या विकाराचा त्रास होत होता. हसन पटेल यांचे कमी वयात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पाशा पटेल यांचे मूळगाव असलेल्या औसा तालुक्यातील लोदगा येथे आज दुपारी दोनच्या सुमारास हसन पटेल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडिल आणि दोन भाऊ असा परिवार आहे.
महत्वाच्या बातम्या;
सरकारने संभाजीराजेंना मॅनेज केल्याचे दिसतंय, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या आरोपाने खळबळ
राज्यातील देवस्थान बोर्डाच्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कधी होणार? शेतकरी आक्रमक
ब्रेकिंग! राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती..
Share your comments