Devendra Fadnavis : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचारदौरे आणि सभांचा धडाका लावल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातील निवडणूक आणि राज्यातील प्रवासाचा ताण यामुळं फडणवीस हे आजारी पडले असून त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसेच डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीवर पाठवलं आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित राहता आलं नव्हतं. त्यामुळं आता फडणवीस हे मुंबईतील सागर बंगल्यावर सक्तीच्या विश्रांतीवर असल्याची माहिती आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत मराठी भाषिक बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर आणि भालकी या भागांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यानंतर मुंबई आणि पुण्यातील संघटनात्मक बैठकीलाही फडणवीस यांनी हजेरी लावली होती.
College of Veterinary Medicine : या ठिकाणी नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय होणार; राज्य सरकारचा निर्णय
गेल्या काही दिवसांपासून सतत प्रवास करावा लागत असल्यामुळं फडणवीस यांची चांगलीच दगदग झाली. परिणामी त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांनी सक्तीची विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. त्यानंतर आता त्यांनी मुंबई तसेच पुण्यातील अनेक नियोजित कार्यक्रम रद्द केले आहे.
Weather Update: या तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज
Share your comments