1. बातम्या

मोठी बातमी! शिवेसनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर

नवी दिल्ली : शिवसेनेच्या (Shiv Sena Latest News) धनुष्यबाणाचा (Dhanush Baan) फैसला लांबणीवर गेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central election Commission) आज धनुष्यबाणाचा निर्णय होणार नाही, अशी माहिती समोर आलीय.

Shiv Sena symbol

Shiv Sena symbol

नवी दिल्ली : शिवसेनेच्या (Shiv Sena) धनुष्यबाणाचा (Dhanush Baan) फैसला लांबणीवर गेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central election Commission) आज धनुष्यबाणाचा निर्णय होणार नाही, अशी माहिती समोर आलीय.

आज धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता होती. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आजच घेतला जाईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होता.

आता समोर आलेल्या माहितीनुसार हा फैसला आज होणार नसल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय लांबणीवर पडला आहे.

मोठी बातमी: राज्यातील 'हा' साखर कारखाना देणार एकरकमी FRP

धनुष्यबाण चिन्हाबाबत शिवसेनेला पुरावे सादर करण्यासाठी दिलेली मुदतही आज संपली आहे. शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लवकर घेतला जावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय लवकर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र हा फैसला पुन्हा लांबणीवर पडला आहे.

शिवसेनेचे नेते दुपारी एक वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करणार आहे. त्यासाठी अनिल देसाई नवी दिल्लीत दाखल झाले. धनुष्यबाण हे चिन्हा शिवसेनेकडेच राहिल, असा विश्वास शिवसेनेच्या वतीने व्यक्त केला जातोय.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ, आता वाढणार हे 4 भत्ते

English Summary: Big news! Decision on Shiv Sena's bow and arrow symbol postponed Published on: 07 October 2022, 12:04 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters