नवी दिल्ली : शिवसेनेच्या (Shiv Sena) धनुष्यबाणाचा (Dhanush Baan) फैसला लांबणीवर गेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central election Commission) आज धनुष्यबाणाचा निर्णय होणार नाही, अशी माहिती समोर आलीय.
आज धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता होती. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आजच घेतला जाईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होता.
आता समोर आलेल्या माहितीनुसार हा फैसला आज होणार नसल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय लांबणीवर पडला आहे.
मोठी बातमी: राज्यातील 'हा' साखर कारखाना देणार एकरकमी FRP
धनुष्यबाण चिन्हाबाबत शिवसेनेला पुरावे सादर करण्यासाठी दिलेली मुदतही आज संपली आहे. शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लवकर घेतला जावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय लवकर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र हा फैसला पुन्हा लांबणीवर पडला आहे.
शिवसेनेचे नेते दुपारी एक वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करणार आहे. त्यासाठी अनिल देसाई नवी दिल्लीत दाखल झाले. धनुष्यबाण हे चिन्हा शिवसेनेकडेच राहिल, असा विश्वास शिवसेनेच्या वतीने व्यक्त केला जातोय.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ, आता वाढणार हे 4 भत्ते
Share your comments