बारामतीमध्ये मोठी बातमी घडली आहे. येथील तहसील कार्यालयातील आवारात धक्कादायक घटना घडली. शेत जमिनीच्या वादात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्याच्या कारणावरून शेतकऱ्याने पेटवून घेतले आहे.
यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, इंदापूरमधील रेडणी येथील शेतकऱ्याने जमिनीच्या वादातून रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याला ताब्यात घेत त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या या शेतकऱ्याची प्रकृती स्थिर आहे. या शेतकऱ्याचे नाव रोहिदास माने असे असून तो शेतकरी इंदापूर तालुक्यातील रेडणी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. शेतकऱ्याने शेतीच्या वादासंदर्भात पोलिसांकडे दाद मागितली होती.
'काळा मुळा' आरोग्यासाठी फायदेशीर, शेतीतून मिळणार बंपर कमाई, जाणून घ्या सर्व काही
त्याच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. तक्रार करुनही न्याय मिळण्यासाठी दिरंगाई केल्याने या शेतकऱ्याने थेट पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे बारामतीमध्ये मोठी खळबळ उडाली.
कारल्याची शेती आहे फायदेशीर, जाणून घ्या..
रोहिदास माने यांनी यापूर्वी उपोषण केले होते. असे असताना मात्र त्याच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. पोलीस बंदोबस्त देऊन रस्ता करू असे आश्वासन देऊन आपली दिशाभूल केली व उपोषण सोडवले आणि न्याय मात्र मिळालाच नाही.
उसावरील मर रोगाचे नियंत्रण, जाणून घ्या...
राज्यात कधी आणि कोठे मान्सून दाखल होणार? जाणून घ्या...
भातशेतीसाठी कशाची गरज? मान्सूनच्या तोंडावर जाणून घ्या सर्वकाही..
Share your comments