दारू हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. असे असताना आता पंजाबमधील दारू प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पंजाबमध्ये दारू (Liquor) स्वस्त करण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत दारूवरील कर कमी करण्यात आला आहे. यामुळे मद्याचे दर 30 ते 40 टक्क्यांनी कमी झाले आहेत.
याठिकाणी मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होते. यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडतो. यामुळे हे रोखण्यासाठी तसेच महसुलात वाढ करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे बिअर, विस्की तसेच इतर प्रकारच्या दारूचे दर तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी झाले आहेत. यामुळे दारूप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.
यामध्ये किमतीचा विचार केला तर, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 750 मिलीच्या बाटलीचा पूर्वीचा दर 500 रुपये इतका होता. आता हीच बाटली 420 रुपयांना मिळणार आहे. तसेच 250 मिलिची बाटली 150 रुपयांना मिळणार आहे. यामुळे याच्या विक्रीत वाढ होणार आहे.
घरात पडेल पैशांचा पाऊस!! 'या' झाडाची करा लागवड, वास्तुशास्त्रात आहे मोठे महत्त्व
दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दारूच्या तस्करीला आळा बसेल असेल सांगितले जात आहे. यामध्ये चंदिगढ आणि पंजाबच्या शेजारी असलेल्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होते. ही दारू अवैध मार्गाने पंजाबमध्ये विकली जाते. अनेकदा यामध्ये कारवाई करण्यात आली आहे. मात्र तरी देखील याच्या केसेस काढत आहेत. यामुळे राज्य सरकारचे आर्थिक नुकसान होते. यात कोट्यवधीचा निधी बुडतो.
महत्वाच्या बातम्या;
थायलंडमध्ये गांज्याच्या लागवडीला आणि विक्रीला मान्यता, मान्यता देणारा पहिलाच देश
शेतकऱ्यांनो सोयाबीन पेरणीबाबत वाचा तज्ञांचा सल्ला, वाढेल उत्पादन
राज्यात सहकारी साखर कारखान्यांकडून 41 टक्के साखर निर्यात, महाराष्ट्र राज्याला असाही फायदा
Share your comments