नवी मुंबई: तुम्हीही एटीएम कार्डधारक आहात का मग आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी आहे. मित्रांनो जर तुम्ही देखील एटीएम मधून पैसे काढत असाल तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आता एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे.
यामुळे एटीएम कार्ड धारक व्यक्तींना याबाबत अवगत राहणे अति महत्वाचे आहे. एसबीआय या देशातील सर्वात मोठ्या बँकेने एटीएममधून व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी आपल्या नियमात मोठा आमूलाग्र बदल केला आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या महत्वपूर्ण माहिती विषयी.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आता तुम्हाला SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागणार आहे. याबाबत एसबीआयने मोठा बदल केला असून आता नवीन नियमानुसार, ग्राहक ओटीपीशिवाय पैसे काढू शकत नाहीत. ATM मधून पैसे काढण्याच्या वेळी, आता ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर एक ओटीपी प्राप्त होईल, तो प्रविष्ट केल्यानंतरच एटीएममधून आता पैसे काढता येणे शक्य होणार आहे. यामुळे एटीएम कार्ड धारकाची होणारी फसवणूक टाळता येणार असल्याचा दावा केला जात आहे.
Small Business Idea 2022: कमी गुंतवणूकीत सुरु करा 'हा' व्यवसाय आणि कमवा लाखों; वाचा याविषयी
बँकेने अधिकृत ट्विटर हँडल वरून दिली माहिती
SBI बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर ट्विट करून ही माहिती सार्वजनिक केली आहे. SBI बँकेच्या म्हणण्यानुसार, OTP आधारित रोख पैसे काढण्याची ही प्रणाली SBI ATM मधील व्यवहारांसाठी फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध एक कारवाही आहे. फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी नियमात बदल केला गेला आहे. ग्राहकांची सुरक्षा जोपासणे हे नेहमीच SBI चे सर्वोच्च धोरण असल्याचे एसबीआयने स्पष्ट केले. यामुळे SBI ग्राहकांना OTP आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली कशी कार्य करणार आहे हे माहित असणे आवश्यक आहे.
'या' ठिकाणी 17 हजारात भेटतेय TVS Jupiter स्कूटर; वाचा याविषयी
काय आहे नवीन नियम
हाती आलेल्या महत्वपूर्ण माहितीनुसार, हा नियम 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रकमेवर लागू करण्यात आला आहे. SBI ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातून नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर OTP आणि डेबिट कार्ड पिन पाठवण्याव्यतिरिक्त, प्रत्येक वेळी त्यांच्या ATM मधून 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी मिळणार आहे.
तेलाचा वारंवार उपयोग करताय का? मग, सावधान! होऊ शकतात हे घातक परिणाम
नवीन नियमाबद्दल जाणून घ्या
»SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी, तुम्हाला OTP टाकावा लागेल.
»यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकवर एक ओटीपी पाठवला जातो एका व्यवहारासाठी चार अंकी क्रमांकाचा OTP ग्राहकाला पाठवला जाईल. रोख रक्कम काढण्यासाठी या स्क्रीनवर बँकेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
1 लाखात घरी घेऊन जा मारुती इको; कसं ते जाणुन घ्या
नियम का बनवला?
बँकेने हा नियम खरं पाहिला तर ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI कडे 22,224 शाखा आणि 63,906 ATM/CDM व्यतिरिक्त भारतातील 71,705 BC आउटलेटचे सर्वात मोठे नेटवर्क मानले जाते.
Share your comments