खरिपातील पिकांसह सर्वच पिकांमध्ये उत्पादन घटण्याचे कारण म्हणजे अवकाळी पाऊस. या अवकाळीमुळे पिकांचे तर नुकसान झालेच मात्र त्याचा आता शेतीमालाच्या दरावर सुद्धा परिणाम होत आहे. यावेळी तिळाच्या उत्पादनामध्ये सुमारे १५ टक्के घट होणार असल्याने संक्रातीच्या वेळी तिळाच्या दरात विक्रमी वाढ होणार आहे. शेतीमधून जास्त उत्पादन निघावे म्हणून शेतकरी वेगवेगळे पर्याय अवलंबत असतो मात्र इतर पिकांच्या तुलनेत तिळाचे उत्पादन कमीच निघते त्यामुळे मागील चार महिन्यात तिळाच्या दरात ४० - ५० रुपयांनी वाढ झालेली आहे. यंदाच्या वेळी तिळाचे उत्पन्न फक्त ३ लाख २५ हजार मेट्रिक टन होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
पावसाचा परिणाम तिळाच्या दर्जावरही...
पाऊसामुळे फक्त तिळाच्या उत्पादनात च घट नाही तर तिळाचा दर्जा सुद्धा कमी झालेला आहे. कारण पाऊसामुळे हलका तीळ तसेच कमी दर्जाचा आणि डाग पडलेला तीळ जास्त प्रमाणात निघाला आहे. तिळाचे उत्पादन थोडक्याच राज्यात घेतले जाते जसे की महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि ओडिशा या राज्यात तीळ लावले जाते.
उत्पादन कमी मागणीत वाढ...
पाऊसामुळे जरी तीळ उत्पादन घटत असले तरी इतर तीळ उत्पादित देशात सुद्धा तिळाचे उत्पादन घटत आहे. देशात सुमारे ५ लाख मेट्रिक टन तिळाचे उत्पादन अपेक्षित असते मात्र यावेळी उत्पादनात २५ टक्के घट होणार आहे. आफ्रिका मधून तिळाची आयात बंद झालेली आहे तर आयात निर्यातीसाठी लागणारा जो कंटेनर आहे त्याच्या भाड्यात सुद्धा वाढ झालेली आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा प्रकारे जगात स्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे आहे पांढऱ्या तीळाला मागणी...
संक्रातीचा सण जवळ आला की तीळाला मोठ्या प्रमाणात मागणी तर असतेच पण आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तीळ महत्वाचे आहेत. सफेद तिळामधून लोह, कॉपर, व्हिटॅमिन बी 6 हे घटक मिळतात जे की या घटकांमुळे रक्त पेशी तयार होऊन शरीरात कार्य नीट प्रकारे करतात. काळ्या तिळामध्ये वृद्धत्व कमी करण्याचे, हाडे मजबूत आणि निरोगी बनवण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे तीळाला जास्त मागणी असल्याचे तज्ञांनी सांगितले.
असे वाढत गेले तीळाचे दर...
महिना - एक किलो दर.
१. जुलै – ९५ - १२५ रुपये.
२. ऑगस्ट – १०० - १३० रुपये.
३. सप्टेंबर – ११० - १४० रुपये.
४. ऑक्टोंबर – १२५ - १६० रुपये.
५. नोव्हेंबर – १३० - १६५ रुपये.
६. डिसेंबर – १३० - १७० रुपये.
Share your comments