कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो कांद्याच्या बाजार भावात आज मोठी वाढ झाली आहे. आज कांद्याला तब्बल तीन हजार ५०० रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत.
कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना अच्छे दिन आले आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो आज झालेले लिलावात अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार ५०० रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे. आज अहमदनगर मध्ये कांद्याची आवक वाढली होती तरीदेखील कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे.
मोठी बातमी : भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
कामठी (तालुका श्रीगोंदा) मधील युवा शेतकरी निलेश बाळासाहेब चेमटे यांचा कांदा ३००० प्रति क्विंटल दराने विकला आहे. कांदा दरात वाढ झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. निश्चितच सध्या मिळत असलेला बाजार भाव शेतकरी बांधवांच्या अपेक्षेप्रमाणे आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
उन्हाळी कांदा दरात मात्र मोठी घसरण झाली आहे. १५०० प्रति क्विंटल एवढाच भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे. सहा ते सात शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा जपला आहे. आता तो कांदा कवडीमोल दराने विकावा लागत असल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे.
Share your comments