onion prices: गेल्या महिनाभरात अनेक भागात अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता कांदा दरात वाढ झाली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. (onion prices)
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी झालेल्या लिलावात प्रति किलो चांगल्या प्रतीच्या कांद्याला 31 रुपये किलो भाव मिळाला असल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड व उपसभापती विलास झावरे यांनी दिली आहे.
गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून कांद्याला सरासरी 15 ते 20 रूपयांपर्यत भाव स्थिर होते परंतु या भाववाढीमुळे पारनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात रविवारी 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या कांदयाच्या लिलावात 28 हजार 497 गोण्यांची आवक झाली असल्याची माहिती सचिव शिवाजी पानसरे यांनी दिली आहे.
आता सरकारकडून फळबागांची लागवड करण्यासाठी तब्बल 100 टक्के अनुदान; असा घ्या लाभ
गेल्या महिनाभरात पारनेर तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून बाजार समितीत 31 रूपये कांद्याला उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळणार असून कांद्याच्या भावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. पारनेर बाजार समितीच्या आवारात कांदा लिलाव आठवड्यातील 3 दिवस चालू राहील.
नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
यावेळी 1 ते 2 प्रतिच्या कांद्याला प्रतिक्विंटल 3000 ते 3100 रुपये बाजारभाव मिळाला तर 2 नंबरला 1300 ते 2100 तर 3 नंबरला 300 ते 1200 रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला. आठवडयातून दर रविवारी, बुधवारी व शुक्रवारी कांदा लिलाव होत असतात. शेतकर्यांनी आपली फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीतच कांद्याची विक्री करावी, असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
कच्च्या तेलाच्या घसरल्या! आज पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले का? जाणून घ्या...
Share your comments