राज्यात फळबागांची (Of orchards) संख्या वाढत आहे. राज्यातून फळपिकांची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. कोकण विभागातून हापूस आंबासह (Hapus mango) इतर फळपिकांची निर्यात केली. आता मराठवाडा आणि विदर्भातून (Mango) केशर आंबा व मोसंबी फळपिकांची निर्याती वर भर देण्यात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात त्या अनुशंगाने आता स्वतंत्र निर्यातीसाठी जिल्ह्यांची व शेतकरी गटाची निवड केली जाणार आहे. निर्यातीच्या धोरणाच्या अनुशंगाने आवश्यक ती माहिती ही पणन विभाग तसेच कृषी आयुक्त (Agricultural Commissioner) यांनाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
शेतकऱ्याचा नादच खुळा; घोड्यांना जुंपले औताला, मशागत झटक्यात उरकली
मोठी बातमी : बनावट शेतीमालाची विक्री केल्यास आता जेलची हवा खावी लागणार
नऊ जिल्ह्यांना होणार फायदा
केशर आंबा उत्पादनात औरंगाबाद, नाशिक, बीड, लातूर, नगर, जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुविधा उभारल्या जाणार आहेत. या नऊ जिल्ह्यामध्ये 21 हजार 500 हेक्टरावर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. त्यानुसार निर्यातीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रीकिलग (Prekilag), कोल्डस्टोरेज(Coldstorage), ग्रेडिज लाईन, पॅक हाऊस आदी सुविधांचा आढावा घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
एप्रिल महिन्यात 'या' भाज्यांची लागवड करून कमवा लाखोंचा नफा..!
तापमानवाढीमुळे जीव गुदमरतोय; घरात लावा 'ही' झाडे आणि मिळवा थंड हवा
आंबा पिकांबरोबरच मोसंबी पिकांसाठीही निर्यात सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. उत्पादनानुसार त्याच जिल्ह्यामध्ये सुविधा केंद्र उभारण्याच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. याचा मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
Share your comments