देशात सध्या दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. जे की इंधनाच्या किमती वाढतच चाललेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागलेली आहे. मात्र या सर्व परिस्थितीत एक चांगली बातमी समोर आली आहे ती म्हणजे कापड उद्योग संबंधी. कपड्यांच्या किमती कमी होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. कापडाच्या आयातीवर कस्टम ड्युटी माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आता कपड्यांच्या किमती कमी होणार आहेत. महागाई कमी होण्यासाठी केंद्र सरकारने कापूस आयातीवरचा जो सीमाशुल्क आहे तो हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ३० सप्टेंबर पर्यंत ही सूट राहणार आहे.
कपड्यांच्या किंमती होणार कमी :-
महागाई वाढतच चालली असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. जे की केंद्र सरकारने कापसाची किमती कमी करण्यासाठी कापूस आयातीवरचा पूर्ण सीमाशुल्क हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता सूत, कापड, फॅब्रिक तसेच कापसापासून बनवलेल्या ज्या ज्या गोष्टी आहे त्यांच्या किमतीमध्ये घट होणार आहे. या कारणांमुळे वस्त्रोद्योग तसेच ग्राहकांना मोठा दिलासा मिळनार आहे. येत्या काही दिवसातच कपड्यांच्या किंमती कमी होणार असल्याचे सांगितले आहे.
५ महिने असणार सूट :-
जे की वस्त्रोद्योगातून ५ टक्के कस्टम ड्युटी हटवण्याची मागणी होत होती तसेच कापसवरील सुद्धा ५ टक्के कृषी पायाभूत सुविधा व विकास कर हटवण्याची मागणी केली होती. मात्र केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कापसवरची कस्टम ड्युटी तसेच कृषी पायाभूत विकास कर हटवण्याचा अधिसूचना जरी केलेल्या आहेत. १४ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० पर्यंत कापूस आयातीवर सूट राहणार असल्याचे सांगितले आहे. जे की या कारणांमुळे कपड्याच्या किमती कमी होणार आहेत.
नागरिकांना मोठा दिलासा :-
कापूस आयतीवरील सीमाशुल्क हटवण्याच्या निर्णयामुळे कपड्यांच्या किमतीमध्ये घट होणार असून उत्पादनाला चालना मिळणार आहे. सूत, कापड, फॅब्रिक तसेच कापुसपासून ज्या गोष्टी तयार होतात त्यांच्या किंमतीमध्ये घट होणार आहे. त्यामुळे आता महागाई च्या दृष्टिकोनात कपड्यांच्या किमती तरी कमी होणार असल्याचे चित्र समोर आले आहे.
Share your comments