सरकारने होर्डिंग रोखण्यासाठी राज्य सरकारशी चर्चा केली जे की मुग डाळ, तुर डाळ आणि उडीद डाळ यांच्या किमती घसरत असल्याचे अन्न व ग्राहक मंत्रालयाने सांगितले आहे. २०२१ मध्ये या डाळींच्या(pulses) किमती स्थिर किंवा त्याची घसरण असल्याचे एका निवेदनात सांगितले आहे.
तूर आणि उडीद डाळीचे दर वाढले:
मंत्रालयाचे असे म्हनणे आहे की एप्रिल ते १६ जून २०२१ च्या दरम्यान या डाळींच्या किमतीमध्ये जानेवारी ते मार्च च्या दरम्यान वाढलेल्या किमतीच्या ०.९५ टक्के ने वाढ होती. आताची तुलना जर आपण २०२० आणि २०१९ बरोबर केली तर २०२० मध्ये ८.९३ टक्के आणि २०१९ मध्ये ४.१३ टक्के ने वाढ झाली होती पण सध्या २०२१ मध्ये फक्त ०.९५ टक्केनी वाढ झाली आहे.१ जानेवारी ते १८ जून या दरम्यान तूर आणि उडीद डाळीचे दर १० रुपये प्रति किलो वाढलेली आहे असे मंत्रालयाने त्यांचे मत मांडले आहे.१ जानेवारीला मूग आणि तूर डाळीची किमंत ११० रुपये झाली होती पण उडीद डाळीची कमीत १०० रुपये प्रति किलो आहे तशीच आहे.
डाळींच्या किमतीचे दर पाहण्यासाठी केंद्र सरकारने आहे तेच राहावेत असे सांगितले आहेत, तसेच केंद्र सरकारने राज्यातील व्यापाऱ्यांना व भागीदारांना त्यांच्या धान्याचा कोठा किती आहे ते पोर्टल वर मांडण्यास सांगितले आहे.जेव्हा पासून पोर्टल सूरी झाले त्यावेळी एका महिना होण्याच्या आधीच २८.६६ लाख टन किमतीचे साठे जाहीर केले आहेत आणि ६८२३ लोकांचे नोंदणीकृत केले आहेत ज्यामध्ये विविध भागांतील लोक सहभागी झाले आहेत.प्रत्येक राज्यातील पोर्टलवर ज्या साठ्यांची नोंद केली होती त्याचा तपशील सरकारने घेतला आणि ज्या भागात राष्ट्रीय स्तरावर असलेल्या भावांपेक्षा जास्त भाव असतील तिथे ताबडतोब कारवाई करण्यास सांगितले.
तसेच चालू वर्ष २०२१-२२ मधील डाळींचे बफर राखण्यासाठी सरकारने लक्षणीय आकार २३ लाख टनापर्यंत वाढवला आहे.सध्या चना डाळ आणि मुग डाळीची खरेदी चालू असून ग्राहक डाळी विकत घेण्यासाठी सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या एजन्सीमध्ये भाग घेत असल्याचे दिसून येत आहे.केंद्र सरकार कल्याणकारी कार्यक्रमासाठी डाळींच्या साठ्यातील काही साठा पुरवत असते तर त्यामध्ये ज्या किमती आहे त्या किमती मध्ये सुद्धा घट करून ते कार्यक्रमासाठी देत असते.
Share your comments