नवीन कृषी पंप विज धोरण 2020 अंतर्गत कृषी वीज देयक थकबाकीदारांना वीज बिल भरण्यासाठी आकर्षक सवलत देण्यात येणार आहे. कृषी पंप विज धोरण 2020 संदर्भात माहिती देण्यासाठी मंत्रालयातील विधिमंडळ वार्ताहर संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली.
पुढे नितीन राऊत म्हणाले की कृषी पंपांना नवीन वीज जोडणी देणे तसेच कृषी वाहिन्यांवर दिवसा आठ तास वीज पुरवठा करणे, कृषी पंपा करिता पायाभूत सुविधा उभारणे आणि टप्प्याटप्प्याने सवलती देत थकबाकी वसूल करणे या बाबी प्रामुख्याने या धोरणात समाविष्ट आहेत. मार्च 2018 पूर्वीच्या वीज जोडणी प्राधान्य देऊन नव्याने वीजजोडणीसाठी आलेल्या दोन लाखांपेक्षा जास्त अर्जानुसार वीजजोडणी देण्याचा शासन प्रयत्न करणार आहे असे ते म्हणाले. जर थकबाकीचा विचार केला तर कृषी क्षेत्राची सुमारे 40 हजार कोटी थकबाकी असून शासनाकडून 2012 पासून अनुदानात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. ही थकबाकी वसूल करण्याच्या योजनेला तीन वर्षाची मुदत असून लघु व उच्च कापसे जलसिंचन योजनेचे सर्व ग्राहक योजनेत सहभागी होऊ शकते.
हेही वाचा:कुसुम योजनेअंतर्गत ठराविक रक्कम भरून शेतात बसवा कृषी सौर पंप
जे शेतकरी सन 2015 पूर्वीची थकबाकीदार आहेत अशा शेतकऱ्यांचे विलंब शुल्क आणि व्याज पूर्णतः माफ करण्यात येणार असून केवळ रक्कम वसूल करण्यात येणार आहे. हा विलंब शुल्क माफ करत असताना व्याजदर सध्याच्या 18 टक्क्यांऐवजी आठ ते नऊ टक्के आकारण्यात येणार आहे अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने वसूल करण्यात येणार आहे. तसेच या योजनेनुसार पहिल्या वर्षात तर बाकीचे जेवढे पैसे शेतकरी भरतील तेवढीच रक्कम त्यांना क्रेडिट देण्यात येणार आहे. नंतरच्या वर्षात भरलेल्या पैशाच्या 20% क्रेडिट देणार आहे. या सगळ्या थकबाकी तून मिळणाऱ्या शुल्कामधून ते 30 टक्के ग्रामपंचायतीला हद्दीतील विजेच्या पायाभूत सुविधा तसेच सेवा सुधारणेसाठी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
Share your comments