Big Breaking: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि देशभरातील राजकारणात दबदबा असलेले मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांनी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात (Medanta Hospital) अखेरचा श्वास घेतला आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांच्यासह अनेक कुटुंबीय उपस्थित होते. मुलायम सिंह यांच्या निधनाची (passed away) बातमी समजताच देशभरात शोककळा पसरली.
आठवडाभरापासून रुग्णालयात होते
सध्या समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि संरक्षक म्हणून भूमिका बजावत असलेले ८२ वर्षीय मुलायम सिंह यादव यांना गुरुग्राममधील (Gurugram) मेदांता हॉस्पिटलमध्ये सुमारे आठवडाभर उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.
याशिवाय त्यांच्या किडनीमध्येही समस्या आढळून आल्या होत्या. त्यांचे हेल्थ बुलेटिन रुग्णालय व्यवस्थापनाकडून दररोज जारी केले जात होते. डॉक्टरांनी सांगितले की ते काही दिवसांपासून जीवरक्षक औषधांवर होता.
सोयाबीनला 8600 आणि कापसाला 12500 रुपये MSP निश्चित करण्याची शेतकऱ्यांची मागणी; अन्यथा आंदोलन करणार
मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अचानक बिघडली तेव्हा त्यांचा मुलगा आणि सपा प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि मुलायम यांचे चुलते राम गोपाल यांच्यासह अनेक कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित होते. त्याचवेळी रुग्णालयाबाहेर पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले आहेत.
डेअरी फार्म सुरु करा आणि कमवा लाखोंचा नफा; सरकार देतंय २५ टक्के सबसिडी
नेताजींच्या निधनाबाबत समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही माहिती देण्यात आली आहे. अखिलेश यादव यांनी नेताजींच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.
महत्वाच्या बातम्या:
दिवाळीच्या तोंडावर सोने आणि चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर! सोने 4300 तर चांदी 19000 रुपयांनी स्वस्त...
शेतकऱ्यांमागील साडेसाती हटेना! मिरची उत्पादक अडचणीत; पावसामुळे लाल मिरची काळी पडल्याने मोठे नुकसान
Share your comments