MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोला मोठा धक्का! प्लांट बंद करण्याचे आदेश, रात्री 2 वाजता आली नोटीस...

आमदार रोहित पवार यांच्या बारामतीमधील बारामती ॲग्रो या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. रोहित पवार यांना रात्री २ वाजता नोटीस दिली असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Rohit Pawar

Rohit Pawar

आमदार रोहित पवार यांच्या बारामतीमधील बारामती ॲग्रो या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. रोहित पवार यांना रात्री २ वाजता नोटीस दिली असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, नोटीस पाठवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन प्लांट बंद करण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत. रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. यामुळे चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत ट्विट करत रोहित पवार म्हणाले, राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.

युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो.

भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे. हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो.

परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही.

आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो.

परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, ही खात्री आहे. असो! पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे.

या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील. असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

English Summary: Big blow to Rohit Pawar's Baramati Agro! The order to close the plant, the notice came at 2 in the night... Published on: 28 September 2023, 01:27 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters